रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल अशोक बाबर यांचा डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार


रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल  अशोक बाबर यांचा डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीवर अशोक बाबर यांची नियुक्ती झाली असता निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी बाबर यांचा सत्कार केला. यावेळी रावसाहेब मांडे, हिराशेठ लखारा, जि.प. बाल कल्याण समितीच्या माजी सभापती पुष्पाताई बाबर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, सुमन पवार, वैभव पवार आदी उपस्थित होते. 

पै. नाना डोंगरे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेने बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी मोठे कार्य केले आहे. रयतमध्ये अनेक दिग्गज व्यक्तीमत्व घडले असून, शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. या संस्थेच्या समन्वय समितीवर अशोक बाबर यांची नियुक्ती होणे भूषणावह बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक बाबर यांनी निमगाव वाघातील ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने भारावलो असून, पै. नाना डोंगरे यांचे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News