नाशिक जिल्ह्यातील आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागा - छगन भुजबळ*


नाशिक जिल्ह्यातील आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागा - छगन भुजबळ*

नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक संपन्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेल्या आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. नाशिक जिल्ह्यात आगामी नगरपंचायती निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, देवळा तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, पेठ तालुकाध्यक्ष दामु राऊत, चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, सुरगाणा राजु पवार, योगेश आहेर, ॲड.नवनाथ आहेर, देवीदास शेलार, शाम हिरे, सुनिल कबाडे, रिझवान घासी, तौसिफ मनियार, भुषण पगार, सागर कुंदे, जयेश पगार, गोपाळ धुम, जितेंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात लवकरच कळवण, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टीची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व नगरपरिषदांचा आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवून नगरसेवकांची संख्या कशी वाढेल यासाठी निवडणुकीच्या तयारी करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी दिंडोरी, पेठ नगरपंचायत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाड नगरपंचायतीची जबाबदारी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच कळवण, सुरगाणा नगरपंचायतीची जबाबदारी आमदार नितीन पवार यांच्याकडे तर चांदवड, देवळा नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांना देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ समवेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, आ. दिलीप बनकर, आ. नितीन पवार, डॉ.सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ आदी दिसत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News