सहा वर्षाच्या चिमुकलीने 12 तासात सायकलिंगवर 143 कि मी अंतर पार करून केला विक्रम, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला सत्कार


सहा वर्षाच्या चिमुकलीने 12 तासात सायकलिंगवर 143 कि मी अंतर पार करून केला विक्रम, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला सत्कार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

गोखळी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील सहा वर्षाच्या    कु. स्वरा  भागवत ने 12 तासांत सायकलींग करत 143 कि.मी.अंतर सर करून विक्रम केला.  या यशस्वी कामगिरी बद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते कु.स्वरा भागवत चा सत्कार करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, उपसरपंच योगेश गावडे पाटील, नवनाथ गावडे, छावा ग्रुपचे योगेश जाधव साहेब,पञकार राजेन्द्र भागवत, योगेश भागवत उपस्थित होते. 

कु.स्वरा भागवत गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत यांची कन्या असुन वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहायला शिकली आहे. सायकलींग बरोबर धावणे, दोरीवरील एका दमात 100 उड्या चे 10 सेट, ट्रेकिंग,

स्किटींग असे विविध  छंद जोपासले आहेत. बुधवार दि.4 नोव्हेंबर रोजी गोखळी -बारामती -मोरगांव-जेजुरी -नीरा -लोणंद-फलटण -राजाळे -गोखळी असा 143 कि.मी.अंतराचा सायकल प्रवास 12 तासात पूर्ण करून विक्रम केला.पहाटे 3:45 वाजता प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी चार वाजता गोखळी येथे संपला.  कु.स्वरा हिस तिचे वडील योगेश भागवत यांनी सर्व पोहणे,धावणे, दोरी उड्या आणि सायकलींचे सर्व  प्रकारचे प्रशिक्षण देतात वडील फलटण एस.टी.आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत.तिचे काका पोलीस उपनिरक्षक श्री रूपेश भागवत आणि पोलीस काॅस्टेबल निलेश भागवत,आजोबा राजेन्द्र भागवत  (पञकार ) यांना सर्वांना व्यायामाची आवड असल्यामुळे स्वराने यांच्याकडून प्रेरणा घेतली,व लोक डाऊन मध्ये आपल्या व्यायामाला सुरुवात केली.घरातूनच व्यायामाचा वारसा मिळालेल्या स्वराचे  कमी वयातील अनोख्या विक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News