जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्राथमिक शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडने काळाची गरज !! -आमदार आशुतोष काळे


जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्राथमिक शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडने काळाची गरज !! -आमदार आशुतोष काळे

हंडेवाडी येथे जिल्हा कार्ययोजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या नवीन शाळा खोलीचे उद्घाटन डिजिटल क्लास रूमचे लोकार्पण प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल शिक्षण ही काळाची गरज बनली आहे.सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी नाही मात्र जगाच्या स्पर्धेत उतरायचे असेल तर बुद्धिमते बरोबर डिजिटल तंत्रज्ञान सुद्धा या विद्यार्थ्यांना अवगत असण आवश्यक आहे.त्यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्राथमिक शिक्षण हि तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

           कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथे जिल्हा कार्ययोजने अंतर्गत जि.प.सदस्य सुधाकर दंडवते यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या नवीन शाळा खोलीचे उद्घाटन व डिजिटल क्लास रूमचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सर्व क्षेत्रात सर्वच प्रकारचे व्यवहार होत असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी डिजिटल क्लासरूम मोलाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. हंडेवाडी  ग्रामपंचायतीने या शाळेसाठी पेव्हर ब्लॉक बसविले व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अॅरो दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी हंडेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून सुरु असलेल्या हंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

                यावेळी पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक अशोक तिरसे, सोमनाथ घुमरे,सोमनाथ चांदगुडे, निवृत्ती घुमरे,सदाशिव देशपांडे, श्रीराम राजेभोसले,शिवराम भारती,रावसाहेब भारती,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर भारती,भाऊसाहेब भारती,भाऊसाहेब चव्हाण, पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता पी.एम. शिंदे,राहुल जगधने, सरपंच श्रीम.शालिनी गोधडे, उपसरपंच सौ.वैशाली चव्हाण, सदस्य सौ.कल्पना भारती, सौ.सुनिता आहेर,सौ.ज्योती शिंदे, नवनाथ चव्हाण,सतीश कोकाटे, नाना सोनवणे,ग्रामसेवक पी.एम.गावित आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामेश्वर चत्तर यांनी केले व आभार ज्ञानेश्वर सांबरे यांनी मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News