केंद्र शासनाचा अंतरिम सुरक्षा सेवा पदक विजेते नारायण पवार यांनी स्वीकारला दौंड पोलीस स्टेशनचा पदभार, दौंड शहरासह पोलीस स्टेशन अंतर्गत गावांचा घेतला आढावा


केंद्र शासनाचा अंतरिम सुरक्षा सेवा पदक विजेते नारायण पवार यांनी स्वीकारला दौंड पोलीस स्टेशनचा पदभार, दौंड शहरासह पोलीस स्टेशन अंतर्गत गावांचा घेतला आढावा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी ग्रामीण पोलीस दलातील 48 पोलीस अधिकाऱ्यांच्या  प्रशासकीय व विनंती बदल्या  केल्या होत्या त्यामध्ये 16 PI,13 API,19 PSI यांचा त्यामध्ये समावेश आहे,त्यामधूनच दौंड पोलीस ठाण्यात केंद्राचा अंतरिम सुरक्षा सेवा पदक आणि महाराष्ट्र शासनाचा खडतर सेवा पदक आणि पोलीस महासंचालक यांचे कडून सन्मान पदक प्राप्त  वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे,8 मे 1995 मध्ये पोलीस दलात आलेले नारायण पवार यांनी सुरवातीची तीन गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावले आहे,नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावल्या बद्दल त्यांना वरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,2009/10 या वर्षात मंचर पोलीस स्टेशन अंतर्गत कोणत्याही गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्या प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद केले,याच पोलीस स्टेशन अंतर्गत काम करत असताना तब्बल 52 गावांना तंटामुक्त पुरस्काराने सन्मानित केले,त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता गुन्हेगारी मोडीत काढली,त्या परिसरातील जबरी चोऱ्या,दरोडे,घरफोड्या,गुंडांच्या टोळ्या  यांच्या विरुद्ध मोका,तडीपारीच्या कारवाई करून सामान्य जनतेला दिलासा दिला,सातारा जिल्ह्यात भुईंज,पाचगणी काम करताना खून,खुनाचा प्रयत्न, अपहरण,बलात्कार अशा गुन्ह्यातील आरोपींना कारवाई करून जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवले,असे प्रत्येक पोलीस स्टेशन येथे आपला वेगळा ठसा उमटवणारे नारायण पवार हे दौंड पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर हजर झाले आहेत, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले गुन्हा आणि गुन्हेगार यांना कोणत्याही प्रकारची सुटका मिळणार नाही, एकतर गुन्हे करू नका,किंवा आजूबाजूला घडू देऊ नका,घडलेच तर कोणीही हस्तक्षेप करू नका,गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, सामान्य जनता सुखी आणि समाधानी राहिली पाहिजे,कोरोना मुळे जनता हैराण झाली आहे, सणवार व्यवस्थित पार पडले पाहिजेत त्यामध्ये कोणीही विघ्न येऊ देऊ नये,अशा शब्दात त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे.त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात चार्ज घेताच दौंड शहराचा आढावा घेतला असून दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावांना भेट देऊन तेथील आढावा घेण्यात येणार असल्याचे दौंड चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News