वयोवृद्ध व तळागाळातील रुग्णांसाठी जालिंदर बोरुडे हे आधारवड - अभिषेक कळमकर


वयोवृद्ध व तळागाळातील रुग्णांसाठी जालिंदर बोरुडे हे आधारवड - अभिषेक कळमकर

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी सातत्यपूर्ण सामाजिक काम करून निस्वार्थपणे रुग्णसेवेचे व्रत घेतले आहे.आतापर्यंत फिनिक्स सोशिअल फाउंडेशनच्या माध्यमातून १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.नोकरी करत असताना आपण समाजाचे देणे लागतो म्हणून सामाजिक भान ठेवून स्वतःच्या पगारातील काही पैसे सामाजिक कार्यात खर्च करत आहेत.हि  कौतुकास्पद बाब आहे.कोणाची मदत न घेता स्वतः पदरमोड करून बोरुडे यांनी अवयव दान, नेत्रदान,रक्तदान,वृक्षारोपण,दंतरोग शिबीर,मधुमेह शिबीर,हृदयरोग शिबीर असे अनेक आरोग्य शिबिर फिनिक्स सोशिअल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी घेतले जातात.नेत्रदानाविषयी जनजागृती चळवळ  वर्षभर चालवून अनेकांना दृष्टी देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील महात्मा गांधी हेल्थ फाउंडेशनचा राष्ट्रीय सदभावना पुरस्कार दिला आहे.बोरुडे यांनी निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न करता रुग्णसेवेचे नेत्रदीपक कार्य केले आहे.रुग्णांना न परवडणारा औषोधोपचाराचा खर्च यामुळे अनेक रुग्ण उपचाराविना वंचित राहतात.या वयोवृद्ध व तळागाळातील रुग्णांसाठी जालिंदर बोरुडे हे आधारवड बनले आहे.असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे.                  

 दिल्ली येथील महात्मा गांधी हेल्थ फाउंडेशनचा राष्ट्रीय सदभावना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा सत्कार माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विनायक नेवसे,उमेश भांबरकर आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News