माजी सभापती सुनिल देवकर यांचे कडुन उस तोडणी कामगारांचे मुलांना स्वेटर वाटप !!


माजी सभापती सुनिल देवकर यांचे कडुन उस तोडणी कामगारांचे मुलांना स्वेटर वाटप !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी उसतोडगी कामगारांचे मुलांना थंडीपासुन बचाव करण्या दृष्टीने स्वेटर आणि गरम कपड्यांचे वाटप केले

  कोपरगाव तालुक्यातील दोनही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असुन बाहेरील तालुका तसेच जिल्हांमधुन मोठ्या प्रमाणावर उस तोडणी कामगार पंचक्रोशीत दाखल झाले आहे. शेतावर तसेच वाडयावर वस्त्यांवर वास्तव्यास असल्याने मोजक्या संसारोपयोगी वस्तु जवळ बाळगाव्या लागत असल्याने बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यात

सध्या कडक्याची थंडी पडत आहे. तरीही अश्या थंडीतही पहाटे ऊठुन आपल्या मुला बाळांसह उसाच्या फडावर जाणे अनिर्वाय असते, अश्याच एका सकाळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी ऊस तोडणी कामगारांच्या चिमुकल्या मुलांना  रस्त्यावर थंडीने कुडकुडताना पाहीले आणी त्यांच्यातला माणुस जागा झाला  व आपल्याला समाजाचे काही देण लागते,या भावनेने तात्काळ स्वेटर व गरम .कपडे मागवुन या चिमुकल्यांचा पालकांच्या स्वाधिन करून माणुस कि जपली.या अगोदर ही सुनिल देवकर यांनी साई फार्मुल्स क्लबचे अध्यक्ष मनिष देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कामगारांना . शिधा व कपडे वाटप केले आहे.

आपल्या वाट्याच्या माणुसकी उब देऊन तर बघा ! त्यांचे हसरे चेहरे पाहुन तुमची थंडी ही दुर पळेल..!!  -सुनिल देवकर.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News