नगर,मनमाड रोड वरील खड्डे बुजवण्यात कॉन्ट्रॅक्ट दाराकडून दुजाभाव, तीव्र आंदोलन छेडणार,,,,,विजयराव काळे


नगर,मनमाड रोड वरील खड्डे बुजवण्यात कॉन्ट्रॅक्ट दाराकडून दुजाभाव, तीव्र आंदोलन छेडणार,,,,,विजयराव काळे

शिर्डी , राजेंद्र दूनबळे ( प्रतिनिधी)नगर-मनमाड या महामार्गावर निमगाव पर्यंत खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्यात आले मात्र निमगाव निघोज पासून तर सावळीविहीर फाट्यापर्यंत सरसगट खड्ड्यांमध्ये माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला असून यामध्ये ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी मोठा गफला केल्याचे आता परिसरात मोठी चर्चा होत असून जर त्वरित हे खड्डे डांबर व खडी टाकुन बुजवले नाही तर त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असे वाहनधारक व नागरिकांनी इशारा दिला आहे ,नगर मनमाड हा महामार्ग अत्यंत खड्डेमय झाला आहे, त्यासाठी राज्य शासनाने खड्डे बुजवण्यासाठी निधी मंजूर करून दिला, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे खड्डे बुजवण्यात येत आहेत, राहत्या कडून शिर्डी सावळीविहीर निमगाव निघोज पर्यंत नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे खडी व डांबर टाकून रोलिंग करून चांगल्या पद्धतीने बुजवण्यात आले, मात्र निमगाव निघोज साई पालखी निवारा पासूनच सावळी विहीर फाट्यापर्यंत याच नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजवण्यात आले, रोलिंग सुद्धा केली गेली नाही त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे ,तसेच या माती मिश्रित मुरूमातील मोठमोठे दगड वरून मालट्रक यांचे टायर फुटताहेत, अपघात होत आहेत, आतापर्यंत अनेक अपघातात वाहनधारक जखमी झाले आहेत, अनेकांचे जीव गेले आहेत, याला जबाबदार कोण? जर वर्क ऑर्डर डांबर व खडी टाकून खड्डे बुजवण्याची होती तर मग माती मिश्रित मुरूम का टाकण्यात आला, यामध्ये कोणकोण अधिकारी व ठेकेदार आहेत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, हे जर यामध्ये ते दोषी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व या साई पालखी निवारा ते फाट्यापर्यंत त्वरित खडी व डांबर करण करून खड्डे बुजवावीत, अशी मागणीही शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयराव काळे यांनी केले आहे त्यांनी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना ही तसा जाब विचारला आहे, अन्यथा वाहनधारक नागरिक नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे ,

राज्याचे अन्न व पुरवठा नागरी मंत्री नामदार छगन भुजबळ  हे काल गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला शिर्डी कडे येत असताना त्यांनी या खड्ड्यांचा अनुभव घेतला, दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी नामदार छगन भुजबळ यांच्या कार व त्यांच्या पाठीमागे पोलीस गाड्यांचा व कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा एकामागे एक शिर्डीकडे येत असताना सावळीविहीर व परिसरात नगर-मनमाड महामार्गावर असणाऱ्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा अनुभवना, छगन भुजबळ यांना मिळाला, ते राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम  मंत्री सुद्धा आहेत, या खड्ड्यांच्या हेलकावे घेत त्यांनी कसेबसे शिर्डी शासकीय विश्रामगृह गाठले,ना,छगन भुजबळ यांनीही यावेळी खासगीत त्यांनी या खड्ड्यां बाबत नाराजी व्यक्त केली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News