सणासुदीच्या काळात कापड बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी


सणासुदीच्या काळात कापड बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी पोलीस उपअधिक्षकांना निवेदन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, निलेश इंगळे, कुमार नवले, अ‍ॅड. मंगेश सोले, गणेश बोरुडे, शहानवाझ शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 टाळेबंदी काळात व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ बंद होती. सध्या बाजारपेठा खुल्या झाल्या असून, कापड बाजार परिसरात दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या दरम्यान भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, बाजारपेठेत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहे. तर खीसे कापण्याचा प्रकार घडत आहे. बाजारात महिला मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असताना गळ्यात मंगळसुत्र व सोन्याचे दागिने असतात. त्यांचे दागिने चोरी जाण्याचे प्रकार देखील घडले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

गर्दीचा फायदा घेऊन कापड बाजारात भुरट्या चोर्‍या वाढल्या असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीसांनी बाजारात गस्त वाढविल्यास अशा चोरीच्या प्रकाराला अळा बसेल. यासाठी तातडीने कापड बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News