आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या पार्श्‍वभूमीवर घरकुल वंचितांची बैठक मंगळवार पासून होणार प्लॉटचे वाटप


आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या पार्श्‍वभूमीवर घरकुल वंचितांची बैठक मंगळवार पासून होणार प्लॉटचे वाटप

स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना दुरितांची स्नेह माऊली सन्मानाने अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी सजय- सावंत) मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून निंबळक येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात 1 गुंठा जमीन देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे बैठक घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, किशोर मुळे, पुनम पवार, सुरेखा आठरे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी सामजिक कार्य उभे करुन वंचितांचे आश्रू पुसण्यासह त्यांना मायेने आधार देणारे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना दुरितांची स्नेह माऊली सन्मानाने अभिवादन करण्यात आले. आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात 1 गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होणार आहे.मंगळवार दि.10 नोव्हेंबर पासून 80 हजाराचा धनादेश घेऊन जागेची साठे खत लिहून देण्यात येणार आहे. तसेच घरकुलसाठी असलेल्या पंडित दिनद्याळ उपाध्याय (डीआरडीए) या योजनेतंर्गत घरकुल वंचितांना 50 हजाराचे अनुदान देखील मिळणार असल्याने अवघ्या 30 हजार रुपयात 1 गुंठा जागा अल्पदरात उपलब्ध होणार असल्याची भूमिका अ‍ॅड. गवळी यांनी बैठकीत मांडली.

  डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयाच्या माध्यमातून मोठ्या उंचीचे सामाजिक कार्य उभे केले आहे. यापुर्वीच त्यांना भारत सरकारचा पद्म पुरस्कार मिळणे अपेक्षित होता. मात्र हा पुरस्कार न मिळाल्याने त्यांना सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा सन्मान बहाल केला जाणार आहे. त्यांच्या सामाजिक कार्यानी दीन, दुबळे व वंचित घटकांना मोठा आधार मिळाला आहे. अंधकारात चाचपडणार्‍यांचे जीवन त्यांनी प्रकाशमान केले. याचा एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने दिवाळीत एक दिवा स्नेहालयाच्या नावाने लावण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर या दिवाळीत प्रत्येक कुटुंबाने स्नेहालय संस्थेला आपल्या परीने मदत करुन वंचितांची दिवाळी गोड होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. वनश्री बलभिम (आण्णा) डोके नगर येथील रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु आहे. सदर रस्ता व वीजचे प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन आमदार निलेश लंके यांना देण्यात येणार आहे. तर पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद माधवराव लामखडे यांची देखील घरकुल वंचित भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बालिकाश्रम रोड लेंडकर मळा येथील स्नेहालयच्या कार्यालयात दिलेले घरकुल वंचितांनी भरलेले अर्ज व जमीनीच्या किंमतीचा धनादेश जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धनादेश देणार्‍या घरकुल वंचितांना ताबा पावती देण्याची देखील व्यवस्था जागा मालकाकडून करण्यात आली आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News