सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी
कानगांव (ता .दौंड )येथे ग्राहकांच्या सोईसाठी रामानंद एच पी गॅस एजन्सी यांचे सुविधा केंद्र श्री भैरवनाथ एच पी गॅस सब एजन्सीचे उदघाटन सामारंभ रविवार दि ८ नोव्हेबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता ह भ प वरुणनाथजी महाराज कानगांव यांच्या हस्ते झाले .त्या प्रसंगी श्री भैरवनाथ सब गॅस एजन्सीचे मालक रोहनशेठ सरडे यांनी सांगीतले, ज्या गॅस धारकांचे गॅस कनेक्शन रामानंद एच पी गॅस एजन्सी पाटस यांच्याकडे आहे त्या गॅस धारकांना आता कानगांवमध्ये आठवड्याचे सात ही दिवस २४ तास गॅस कोणताही अतिरिक्त चार्ज ने देता उपलब्ध होणार असून जेष्ठ नागरिक व अपंग गॅस धारकांसाठी घरपोच सेवा मिळणार आहे. उदघाटन प्रसंगी गावातील पदाधीकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते.