नगर: (प्रतिनिधि संजय सावंत)
सकाळ पासुन मोठ्या प्रमाणात दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजारात नगरिकांनी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. खरेदीचा उत्साह होता, परंतु त्या गर्दीत काहीशी अनामिक भीती होती. कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराची ही भीती होती. असे असले, तरी ही भीती साहित्य खरेदी करताना दाबून जात होती. कापडबाजारातील रस्त्यांवरील गर्दीमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार वारंवार झाले. दुचाकी, चारचाकी वाहने कापडबाजार बिनधास्त शिरत होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडी घाईघाईने चालणार्यांचा रस्ता रोखून धरत होती. तरीही वाट निघत होती. साहित्य खरेदी करताना नागरिकांनी मास्क घातले होते. परंतु सामाजिक अंतराचे नियमांचा मात्र विसर पडला होता. खरेदीत सॅनिटायर्झरचा वापरण्याचा विसर पडला होता. बाजारपेठेतील मुख्य दुकाने गर्दीने भरून गेली