घारगाव शिवारात नगर-दौंड रस्त्यावर भीषण अपघात : दोन जण जागीच ठार.


घारगाव शिवारात नगर-दौंड रस्त्यावर भीषण अपघात : दोन जण जागीच ठार.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी:

 दि.८: श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात अहमदनगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व जीप या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवार दि. ७  रोजी  रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

             यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घारगाव शिवारात नगर-दौंड रस्त्यावर निलगिरी हॉटेल नजीक ट्रक क्र.एमएच १२ जे एस ९४४४ व बोलेरो जीप क्र.एमएच १७ ए एन ००५२ यांची समोरासमोर जोरदार टक्कर बसून जीप मधील अहमदनगर येथील  माथाडी कामगार मंडळाचे निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढे (वय ५७) व चालक अशोक पुंजाबा औटी (वय ४८)रा. अहमदनगर हे दोघेजण जागीच ठार झाले. सदरील ट्रक हा शनिवारी रात्री भरधाव वेगाने दौंडच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अहमदनगरकडे जात असणाऱ्या महाराष्ट्र शासन माथाडी कामगार मंडळाच्या बोलेरो जीपला जोराची धडक दिली.या अपघातात ट्रक जाग्यावर पलटी झाला व ट्रक खाली बोलेरो जीप पूर्णपणे दबली गेली .या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून बोलेरो जीप चक्काचूर झाली आहे. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. सदरील घटनेची माहिती समजताच  बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आला . नंतर त्याखाली दबलेल्या जीपला बाजूला काढण्यात आले.टॅक्टर व  गॅस कटरच्या साहाय्याने जीपचा पत्रा कापून पोलिसांनी  स्थानिक तरुणांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली बेलवंडी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News