श्रीगोंदा शहरात दोन ठिकाणी घरफोड्या : लाखोंचे दागिने व रोकड लंपास.


श्रीगोंदा शहरात दोन ठिकाणी घरफोड्या : लाखोंचे दागिने व रोकड लंपास.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.८: श्रीगोंदा शहरातील बालाजीनगर येथील रहिवासी डॉ.विक्रम बलभीम भोसले यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील अंदाजे तीस तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल व याच परिसरातील  बाळासाहेब सोपानराव सूर्यवंशी यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून दीड किलो वजनाचे चांदीच्या देवाच्या मुर्त्या अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे.

          शहरातील बालाजीनगर मध्ये मातोश्री हॉस्पिटलचे मालक डॉ.विक्रम भोसले हे पत्नी सह बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या  हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.  त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे जुने-नवे दागिने अंदाजे तीस तोळे सोने दागिने तसेच  दोन लाखाच्या आसपास रोख रक्कम चोरी करून नेली.घरात लग्नकार्य असल्याने त्यांनी लॉकर मधून काढून आणलेले दागिने घरात ठेवलेले होते.जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते. घरी येण्यासाठी उशीर झाल्याने त्यांनी नातेवाईकांकडे मुक्काम केला.त्यांच्या घरात कुणी नसल्याने चोरट्यांनी संधी साधून घरातील कपटांचे लॉक तोडून मुद्देमाल लंपास केला.जुने-नवे दागिने असा ११ लाखांचा ऐवज व दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली .सकाळी हॉस्पिटलच्या कामगारांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घराचा दरवाजा तोडलेला पाहून पोलिसांना खबर दिली. याबाबत डॉ.विक्रम भोसले यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

तसेच याच परिसरातील बालाजी विहार सदनिकेमध्ये राहणारे प्रा.बाळासाहेब सोपानराव सूर्यवंशी हे गावी गेले असल्याने त्यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून त्यांच्या घरात उचकापाचक करून चांदीच्या देवाच्या अंदाजे दीड किलो वजनाच्या अंदाजे एक लाख रुपयांच्या मूर्तींची चोरट्यांनी चोरी केली.विशेष म्हणजे चोरट्यांनी सूर्यवंशी यांचे घर फोडण्यापूर्वी सदनिकेच्या पार्किंगमध्ये बसून दारू पिऊन तिथेच दारूच्या बाटल्या टाकल्याचे निदर्शनास आले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दोन्ही ठिकाणी भेट दिली.घटनास्थळी अंगुलीनिर्देश तद्द तसेच श्वान पथक बोलविण्यात आले होते. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News