कोपरगावात आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती शांततेत साजरी !!


कोपरगावात आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती  शांततेत साजरी !!

दि. ८ नोव्हेंबर  2020 रविवार रोजी कोपरगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम समाजबांधवांच्या उपस्थितीत व कोरोना संसर्ग टाळून सामाजिक आंतर राखत  साजरा करण्यात आला . 

यावेळी सर्व समाज बांधवांनी  आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले .

या प्रसंगी आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक पात्र आदिवासी बांधवांना देण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांना आदेशित केले .तसेच आदिवासी महादेव कोळी युवक संघटना अहमदनगर जिल्हा यांचेमार्फत आदिवासी बांधवांचे विविध समस्या मांडल्या व त्या संदर्भात निवेदन दिले होते त्या सर्वांची पूर्तता करण्यासाठी सन्माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांची समक्ष भेट घेऊन प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली व प्रश्न सोडवण्यासाठी भरीव प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे समाजाच्यावतीने अभिनंदनाचा ठराव मांडुन पास करण्यात आला  त्याचबरोबर कोपरगाव नगरपालिकेचे आदरणीय नगराध्यक्ष श्री विजयरावजी वहाडणे साहेब व  सर्व नगरसेवकांनी, नगरपालिका प्रशासनाने मागील वर्षी सुमारे दोन कोटी खर्चाच्या बाजार ओट्यांना त्यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बाजार ओटे असे नामकरण केले, त्याबद्दल त्यांचेही  अभिनंदन करण्यात आले. आदिवासी विकास विभागातर्फे लवकरच नगरपालिकेच्या वतीने प्रलंबित आदिवासी सांस्कृतिक भवनाची एक कोटी खर्चाची भव्य वास्तू कोपरगावातील 45000 आदिवासींना सर्व सोयी सुविधांसह  वर्षभरात बांधून मिळेल अशी अपेक्षा सर्व समाजबांधवांनी व्यक्त केली .

 या कार्यक्रमासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब  यांनी  संयुक्त जयंती कार्यक्रमासाठी  शुभेच्छा संदेश पाठवला. यावेळी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे ज्येष्ठ समाज बांधव मनोहर शिंदे, भरत आगलावे, चंद्रकांत शेजुळ लक्ष्मण फुलकर,इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News