राजकारण न करता प्रभागातील विकासकामे करणे हेच आमचे ध्येय !!


राजकारण न करता प्रभागातील विकासकामे करणे हेच आमचे ध्येय !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव प्रभाग 04 व 10 मध्ये रस्त्याच्या कामाला शुभारंभ ! ! 

कोपरगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव कोपरगाव मतदारसंघाचे माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असुन त्याच धर्तीवर आम्ही आमच्या प्रभागात विकास कामे करत असुन प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतेही राजकारण केले नाही, राजकारण न करता प्रभागातील विकासकामे करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्र 04 मधील जुबेर गॅरेज ते देवकर घर तसेच प्रभाग क्र 10 गिरमकर घर ते किरण जाधव या भागातील अनेक वर्षापासुन रस्त्याचे काम प्रलंबित होते रस्ता खराब असल्याने परिसरासह बाहेरुन येणारे जाणारे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते सदरचा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी नागरिकांची मागणी होती त्यानुसार प्रभागातील नगरसेवकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन सर्व साधारण रस्ता अनुदानातुन निधी मंजुर झाले त्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.  

प्रभाग क्र 04 मधील रस्त्यांसाठी 07 लाख 92 हजार मंजुर केले. दिलेल्या मंजुरीनुसार सदर रस्त्याचे कामाचे भुमीपुजन प्रभागातील ज्येष्ठ नागरिक केशवराव गवळीसर, आप्पासाहेब मोरे, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, गटनेते रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, शहरध्यक्ष दत्ता काले, विवेक सोनवणे, डाॅ. कुणाल घायताडकर, यांच्याहस्ते करण्यात आले. तर प्रभाग क्र. 10 साठी 10 लाख 70 हजार रस्त्यासाठी मंजुर झाले असुन या रस्त्याचे कामाचे भुमीपुजन प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राजयोग अध्यात्मीक मेडीटेशन ध्यान केंद्राचे प्रमुख सरलादिदी, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेविका हर्षाला कांबळे, बांधकाम सभपती आरिफ कुरेशी, स्वच्छता दुत सुशांत घोडके, अॅड अशोक टुपके, लायन्स क्बलचे अध्यक्ष रोहीत वाघ, डाॅ. नाईकवाडे, डाॅ. बनसोडे, यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी नगरसेवक जनार्दन कदम, दिपक जपे, बाळासाहेब आढाव, रामकृष्ण भडांगे, अशोक लोंढे, रामनाथ वैद्य, बंडु पेटकर, श्री निवृत्ती वाघ, संदीप पाटील, दिपक पाटील, भरत देवकरसर, बी.के. तुरकण, भरत देवकरसर, साहेबराव जाधव, रमेश वराडे, सुनील काळे, सुनील नागरे, महेश थोरे, धनवटे सर, सोमोसे सर, नामदेवराव बिडवे, सचिन जाधव, विवेक सोनवणे, दिनेश कांबळे, रविंद्र रोहमारे, राकेश काले, योगेश नरोडे, किरण जाधव, जावेद शेख, सोमनाथ खैरनार, सौनंजय, घोलप सर, आशुतोष डागा, डाॅ. कुणाल घायताडकर, आदि प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News