श्री साई झुलेलाल मंदिराचे 19 नोहेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन


श्री साई झुलेलाल मंदिराचे 19 नोहेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

शिर्डी राजेंद्र दूनबळे,(प्रतिनिधी)

शिर्डी मध्ये सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने श्री साई झुलेलाल भव्य दिव्य अशा मंदिराचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच दक्षिण नगर चे खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे, त्याचप्रमाणे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी व माजी राज्यमंत्री डॉक्टर गुर्मुखदास जगवाणी त्याचप्रमाणे शिर्डीचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सिंधी समाज बांधवांचे राज्यातील प्रतिष्ठित नेते व शिर्डीतील इतर पक्षांचेही सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या शिर्डी येथील श्री साई झुलेलाल  भव्य दिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे, येथिल  सिंधी समाज साई झुलेलाल ट्रस्ट यांच्या मार्फत हे श्री साई झुलेलाल मंदिर भव्य दिव्य शिर्डीत बनवण्यात येणार आहे व त्याचे भूमिपूजन गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे ,अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्री साई झुलेलाल मंदिर होत असल्यामुळे राज्यातील व इतर राज्यातील सिंधी बांधवांमध्ये मोठा आनंद आहे, कोरोनामुळे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम कोरोनाच्या अटी व शर्ती ठेवून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे  संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी छत्तुमल ईश्वरदास केशवनी यांच्या प्रेरणेने हे श्री साई झुलेलाल मंदिराचे भूमिपूजन होत  असल्याची माहिती श्री सिधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम परसवानी, उपाध्यक्ष गोपीचंद फुंदवाणी, यांनी एका पत्रकाद्वारे दिली असून हा कार्यक्रम शिवाजीनगर शिर्डी येथे संपन्न होणार आहे, या कार्यक्रमासाठी श्री सिधीं समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे गोविंद गरुर, खूपचंद फतणानी, सुरेश केशवानी ,रमेश प्रेमानी ,ओम प्रकाश प्रेमानी गिरीश मेवानी, नरेश दादावानी, श्याम थावानी, वासुदेव रोहरा, विजय ग्वालानी, आदी सदस्य व पदाधिकारी हे या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत, या भव्य दिव्य श्री साई झुलेलाल मंदिरामुळे शिर्डी शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News