उस हार्वेस्टर ही भविष्यकाळाची गरज


उस हार्वेस्टर ही भविष्यकाळाची गरज

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढत चाललेले उसाचे उत्पादनक्षेत्र आणि दरवर्षी होणाऱ्या मजूरटंचाईमुळे उसतोडणीस होणारा विलंब यामुळे उस हार्वेस्टरसारखे शाश्वत यांत्रिकीकरण काळाची गरज असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले.

चोपडज (ता.बारामती) येथे तरडोली येथील मैत्री उद्योग समूहाच्या उस हार्वेस्टरने उसतोडणीस प्रारंभ करताना ते बोलत होते.

    यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, बारामती राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,  सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, भाऊसाहेब करे, बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे, नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय गाडेकर, सोमेश्वरचे शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष  विक्रम भोसले, विक्रम काकडे, मैत्री उद्योग समुहाचे व्यवस्थापक हनुमंत भापकर, भगवान धायगुडे, शेतकरी मदन जांभळे, श्रीकांत जांभळे, रणजित बर्गे उपस्थित होते. 

   यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रासकर म्हणाले की, वाढत चाललेले उसाचे क्षेत्र आणि मजुरांची टंचाई यामुळे कारखान्याने सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून हार्वेस्टर मशिन घेण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. हार्वेस्टर मशिनसाठी कारखाना बिनव्याजी पंधरा लाख रुपये उपलब्ध करून देत आहे. मात्र शेतकऱ्यांनी उस लागवड करताना सरी साडे चार ते पाच फुटाची काढण्याचे आवाहन रासकर यांनी केले आहे.

 यावेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात उस हार्वेस्टरसारख्या मशिन आज कारखान्याचे सभासद घेत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचा रोजंदारीचा प्रश्न सुटत असून निश्चित यातून शेतकरी शेतीशीसबंधित  व्यवसायातून उद्योजक होतील.

बारामती जिरायत भागातील सोमेश्वरचे सभासद हनुमंत भापकर आणि भगवान धायगुडे यांनी जवळपास दीड कोटींची गुंतवणूक करून मैत्री उद्योग समुहाच्या माध्यमातून हार्वेस्टर मशिन घेतले आहे. त्यांचे कारखान्याने कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्री उद्योग समुहाचे व्यवस्थापक हनुमंत भापकर यांनी केले. 

यंदा सोमेश्वर कारखान्याने यांत्रिकीकरणास  दिलेल्या प्रोत्साहनामुळे सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात बारा हार्वेस्टर आले असून यातील दहा हार्वेस्टर हे सभासदांचे आहेत. यांत्रिकीकरणामुळे कारखान्याच्या गाळपाचे उद्दिष्ट आणि वेळेत उसतोडणी सहजतेने होण्यास भरीव मदत होणार असल्याचे कारखान्याचे शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News