शिर्डी नगरपंचायतने स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर त्याची रक्कम त्वरित परत करावी ....शिवसेना


शिर्डी नगरपंचायतने  स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर त्याची रक्कम त्वरित परत करावी ....शिवसेना

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

शिर्डी नगरपंचायतीला श्री साईबाबा संस्थान कडून दर महिन्याला स्वच्छता करा.पोटी 42 लाख 50 हजार रुपये देण्यात येत होते आता ऑक्टोबर 20 20 पासून स्वच्छता करण्यासाठी शिर्डी नगर पंचायतीला दर महिन्याला 28 लाख रुपये खर्च येणार आहे ,व यास शिर्डी नगरपंचायत यांनी मान्यता दिली आहे ,त्यामुळे आता अठ्ठावीस लाखात जर शिर्डी नगरपंचायत शहरांमध्ये स्वच्छता करत आहे तर मग येथून मागे डिसेंबर 2017 पासून श्री साईबाबा संस्थान कडून सुमारे 42 लाख 50 हजार दर महिन्याला स्वच्छता करापोटी नगरपंचायतीने घेऊन  त्यामध्ये मोठा  घोटाळा केला  अशी खात्री आता नागरिकांमध्ये व शिवसैनिकांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा असून या संदर्भात शिर्डी नगरपंचायतने स्पष्ट खुलासा करावा व या स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर त्याची रक्कम त्वरित परत करावी अशी मागणीही शिवसेनेने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे,

 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसेने नेते कमलाकर कोते यांनी पुढे म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतीने यापूर्वी शिर्डीत साईभक्त मोठ्या प्रमाणात येथे येतात म्हणून अस्वच्छता होते, त्यासाठी स्वच्छता कर आकारणीसाठी स्वच्छताकर वसुल करणारे नाके उभारले होते, मात्र त्याचा साईभक्तांना मोठा फटका बसत होता, हा साई भक्तांना त्रास होऊ नये म्हणून साई संस्थांनने नगरपंचायतशी चर्चा करून नगरपंचायतीच्या मागणीनुसार त्यांना स्वच्छताकर नाके बंद करून स्वच्छता करापोटी अनुदान म्हणून दर महिन्याला 42 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे आतापर्यंत श्री साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायतीला दर महिन्याला डिसेंबर 2017 पासून हे पैसे स्वच्छता करापोटी अनुदान देत होती ,मात्र नगरपंचायतीने श्री साईबाबा संस्थान कडून 42 लाख 50 हजार रुपये घेऊन बीव्हीजी कंपनीला पाच वर्षासाठी स्वच्छतेचा ठेका दिला होता ,बीव्हीजी कंपनीचे ठेकेदार स्वच्छता कर्मचारी हे शहरात स्वच्छतेचे काम करत होते, मात्र कोरोनाच्या या काळात श्री साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे, साईभक्त येणे बंद असल्यामुळे साईबाबा संस्थांनला देणगीचा ओघ कमी झाला आहे ,श्री साईबाबा संस्थानकडे देणगी  कमी झाल्यामुळे साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायत ला गेले काही महिन्यापासून स्वच्छता करा ची अनुदान दिले नव्हते, त्यामुळे शिर्डी नगरपंचायतीनेही बीव्हीजी कंपनी च्या स्वच्छता ठेकेदार कामगारांचा पगार दिला नव्हता, त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते, मात्र त्यावेळी शिवसेनेने आंदोलन कामगारांना पाठिंबा दिला व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी चर्चा करून श्री नगरपंचायतीला त्यांचे पगार देण्यास भाग पाडले,

 शिर्डी नगर पंचायतीला श्री साईबाबा संस्थान डिसेंबर 2017 पासून दर महिन्याला 42 लाख 50 हजार रुपये स्वच्छता करापोटी अनुदान म्हणून  देत आली आहे ,  नगरपंचायत ला यापुढे दर महिन्याला फक्त 28 लाख रुपये स्वच्छता खर्च येणार आहे  न,प,ने 28 लाख रुपये स्वच्छताकरण्याचे मान्य केले अाहे, मात्र नगरपंचायत जर 28 लाखांमध्ये दर महिन्याला आता शहरात स्वच्छता करू शकते तर मग येथून मागे त्यांनी श्री साईबाबा संस्थान कडून 42 लाख 50 हजार रुपये कोणत्या धर्तीवर घेतले व अधिक घेतलेले पैसे याचे शिर्डी नगरपंचायत ने काय केले? या पैशामध्ये मोठा घोटाळा झाला  जर आता अठ्ठावीस लाखात शिर्डीत दर महिन्याला स्वच्छता होऊ शकते तर येथून मागे साईबाबा संस्थान कडून शिर्डी नगरपंचायतीने 42 लाख 50 हजार रुपये घेऊन एवढ्या पैशाचे केले काय ? करापोटी मिळणाऱ्या अनुदानातील पैशामध्ये  गफला झाला  याची सर्व चौकशी उच्चस्तरीय पातळीवर व्हावी, व तसे झाले असेल तर त्याचे पैसेही परत श्रीसाईबाबा संस्थांनला परत देण्यात यावे, कारण हा पैसा साईभक्तांचा पैसा आहे, साईभक्तांनी देणगी दिलेल्या पैशातून हे पैसे साईबाबा संस्थान नगरपंचायतला देत होती, जर ह्या पैशात काही घोटाळा झाला  ते साईबाबांचे पैसे म्हणून शिर्डी नगरपंचायतीने  संस्थांनला परत करावे  असे  शिर्डी नगरपंचायत मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेकदा  हा विषय मांडला आहे, अनेकदा त्या विरोधात शिवसेनेने आवाज उठवला होता, मात्र शिर्डी नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटाने आपला मनमानी कारभार सुरू ठेवला होता, मात्र आतातरी या स्वच्छता कराची अधिक घेतलेली रक्कम कुठे गेली? याचा खुलासा शिर्डी नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटाने करावा,अशी मागणी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी या पत्रकाद्वारे केले असून या पत्रकावर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अनिताताई विजयराव जगताप, शिवसेना तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे, शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, सौ कस्तुरीताई मुदलियार, सौ, स्वातीताई परदेशी, सौ लक्ष्मीताई आसने, राहुल गोंदकर, जयराम कांदळकर ,अक्षय तळेकर, आदींची नावे आहेत,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News