शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी जालिंदर आदक तर सचिवपदी अर्जुन बढे


शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी जालिंदर आदक तर सचिवपदी अर्जुन बढे

आप्पासाहेब ढवळे शिरूर | प्रतिनिधी

                शिरुर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष व सचिव या निवडीच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी जालिंदर आदक तर तालुका सचिवपदी अर्जुन बढे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असुन तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत दिले.

            शिरूर येथे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आदक तर सचिवपदी बढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा कार्यकारणीचे शरद पुजारी,शिरूर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक संतोष शिंदे,हवेली तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ,शिरूर तालुका उपाध्यक्ष सुनिल पिंगळे,माजी शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे,शहराध्यक्ष किरण चाैधरी,सुर्यकांत शिर्के,बबन वाघमारे,योगेश भाकरे,आकाश भोरडे,विशाल वर्पे आदिंसह तालुक्यातील पत्रकार अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News