कालवा समितीची बैठक झाली लाभक्षेत्रात,आमदार आशुतोष काळेंचा शेतकऱ्यांनी केला सत्कार


कालवा समितीची बैठक झाली लाभक्षेत्रात,आमदार आशुतोष काळेंचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 मागील पाच वर्षात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात घेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने रहाता येथे पार पडलेल्या उजवा कालवा सल्लागार समितीच्या  बैठकीत नुकताच आमदार आशुतोष काळे यांचा विशेष सत्कार केला असून हि बैठक घेण्यासाठी नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांनी बैठक घेण्यास हिरवा कंदील देवून प्रत्यक्ष बैठक घेतली त्याबद्दल त्यांचा देखील शेतकऱ्यांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार केला आहे.

यावेळी नामदार छगनराव भुजबळ, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आमदार माणिकराव कोकाटे,आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे,अधिक्षक अभियंता श्रीम.अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, पद्माकांत कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक हि मागील पाच वर्षापासून मुंबईला होत होती. ज्यावेळी हि बैठक लाभक्षेत्रात होत असतांना या बैठकीला लाभधारक शेतकरी उपस्थित राहून त्यांना आवर्तनासबंधी येणाऱ्या वितरिका दुरुस्ती करणे, सफाई करणे, आवर्तन मिळण्यास उशीर होणे आदी अडचणी या बैठकीत मांडता येत असे. त्या अडचणीवर चर्चा होवून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुटत होत्या. मात्र मागील पाच वर्षापासून हि बैठकच मुंबई येथे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना उपस्थित राहता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या अडचणींची दखल घेवून व हि बैठक लाभक्षेत्रात घ्यावी याबाबत आमदार आशुतोष काळे हे मागील पाच वर्षापासून प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून हि बैठक लाभक्षेत्रात होण्यास सुरुवात झाली. या बैठकीत लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनासंबंधी आपल्या अडचणी मांडण्याचा हक्क पुन्हा मिळवून दिला आहे.

- कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेतल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना लाभधारक शेतकरी.यावेळी ना. छगनराव भुजबळ, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार लहू कानडे आदी.

या बैठकीत पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ, लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी व पाटबंधारे अधिकारी यांच्यापुढे मांडलेल्या अडचणीतून शेतकरी व पाटबंधारे अधिकारी यांच्या समन्वयातून निश्चितपणे आवर्तन मिळतांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळे हि बैठक पुन्हा लाभक्षेत्रात होत आहे त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करीत असल्याचे लाभधारक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आण्णासाहेब कोते, मुरलीधर थोरात,दिलीप चौधरी आदी शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, ११० किलोमीटर असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याची १९६५ नंतर दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेवून ३०० कोटी स्ट्रक्चरसाठी व दुरुस्तीसाठी ३०० कोटी असे एकून ६०० कोटी रूपये देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र दुर्दैवाने कोरोना संकट आल्यामुळे हा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. त्यापैकी ८४ कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार करून पाठविला आहे त्याबाबत पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांनी लक्ष घालावे.उजवा कालवा हा सिन्नर, निफाड, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आदी तालुक्यातून जात आहे. आवर्तन सुरु असतांना पाटबंधारे अधिकारी शेतकऱ्यांना चुकीची माहिती देवून भांडणे लावण्याचे शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचे यावेळी ना. भुजबळांच्या निदर्शनास आणून दिले.

मागील पाच वर्षात गल्लीपासून-दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी बैठक मुंबईला घेणाऱ्या माजी आमदारांना रस्त्यावर निवेदन देण्याची दुर्दैवी वेळ आली    -पद्माकांत कुदळे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News