शेवगाव नगरपरीषद नामदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार


शेवगाव नगरपरीषद नामदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली  काँग्रेस पक्ष  स्वबळावर लढविणार

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

 आज शेवगाव येथे शहर पक्ष निरीक्षक श्री कार्लस साठे सर ,तालुका निरीक्षक जालिंदरभाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाची शेवगाव नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा  पार पडला . याप्रसंगी पक्ष निरीक्षकानी नामदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषद स्वबळावर लढवावी या पदाधिकारी व  कार्यकर्त्यांच्या मागणीस हिरवा कंदील दिला .  या वेळी तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके यांनी पक्ष ताकत देणार असेल तर पूर्ण ताकती निशी  निवडणूक लढवू असे सांगितले .तसेच मागील निवडणुकीचा  अनुभव व मागील पक्षश्रेष्ठींनी घेतलेली कुचकामी भूमिका याबाबत त्यांनी मत मांडले . यावेळी अहमदनगर जिल्हा सचिव प्रा शिवाजीराव काटे यांनी पक्षाचे ध्येय धोरण याविषयी माहिती दिली व निवडणूक लढविल्याशिवाय पक्ष वाढणार नाही ही भूमिका मांडली . नेवासा तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे ,नंदू कांबळे, तालुका शेवगाव उपाध्यक्ष किशोर कापरे,पांडुरंग नाबदे,प्रा मफिज इनामदार ,अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष बब्बूभाई शेख, अल्पसंख्याक विभाग सचिव शोएब पठाण, तालुका सेवादल अध्यक्ष रामकीसन कराड, धनंजय डहाळे ,सत्तरभाई पठाण   यांनी मनोगत व्यक्त केले . 

तसेच पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय देतील तो सर्वांना मान्य राहील अशी भूमिका मांडण्यात आली . यावेळी श्री दाते सर , सरचिटणीस दशरथ धावणे, युवक अध्यक्ष बब्रू वडघणे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश काटे , गायकवाड महाराज , सांस्कृतिक सेल अध्यक्ष शामराव मोहिते , अर्जुन शेळके ,अमोल दहिफळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन श्री वडघने यांनी केले . आभार पांडुरंग नाबदे यांनी मांडले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News