रनवेवरचे पाणी पाझर तलावात सोडण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध –आमदार आशुतोष काळे


रनवेवरचे पाणी पाझर तलावात सोडण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध –आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

           काकडी विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून काकडी परिसरात पाझर तलावात सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देवून विमान प्राधिकरणाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून येत्या चार महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

         दुष्काळी गावे अशी ओळख असणाऱ्या कोपरगाव-राहाता तालुक्याच्या सीमेवरील काकडी व परिसरातील गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे विमानतळ आणले. विमानतळ झाल्यामुळे जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे दर्शनासाठी येण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर होऊन परिसराचा विकास होण्यास मोठी मदत झाली.विमानतळाच्या माध्यमातून काकडी गावाला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच पुढाकार घेऊन काकडी व परिसराचे अनेक प्रश्न मार्गी लावले. काकडी व परिसरातील भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यासाठी मदत व्हावी यासाठी काकडी विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी काकडीच्या साठवण तलावात साठवले जावे अशी मागणी काकडी ग्रामस्थांची होती. मात्र या मागणीकडे मागील पाच वर्षात या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे काकडी ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे आपल्याकडे मांडले होते. या मागणीचा गांभीर्याने विचार करून व या वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग काकडी परिसराला सुजलाम सुफलाम होण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे याची कल्पना आल्यामुळे  त्याबाबत पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला विमान प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत विमान प्राधिकरणाने नुकतीच ४० लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. विमानतळावरून वाहून जाणारे पाणी काकडी परिसरातील पाझर तलावात पाईप लाईनद्वारे सोडण्याच्या कामास तात्काळ प्रारंभ होणार असून येत्या चार महिन्यात हे काम संबंधित ठेकेदारास करणे बंधनकारक आहे.

            विमानप्राधिकरणाने या प्रश्नाची दखल घेऊन हे काम सुरु केले त्याबद्दल काकडी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विमानप्राधिकरणाचे उपसंचालक दीपक कपूर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चंद्रशेखर गुप्ता, कार्यकारी अभियंता राजकुमार बेरी, विमानतळ संचालक दीपक शास्त्री, सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. यापुढे देखील काकडी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच पद्धतीने सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

- माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या काकडी व परिसरातील गावांचा आर्थिक विकास साधला. या विमानतळावर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पाझर तलावात साठविले जाऊन परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढल्यास मदत होणार आहे. एकीकडे विमानतळाच्या माध्यमातून आर्थिक विकास व सोयीसुविधा तर दुसरीकडे या पाण्याच्या माध्यमातून परिसरातील शेती समृद्ध होण्यास मदत होणार असून हा परिसर खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम होण्यासाठी हातभार लागला हे मी माझे भाग्य समजतो.

 –आमदार आशुतोष काळे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News