पश्चिमसमुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या आ.आशुतोष काळेंच्या प्रस्तावाला पाठिंबा देवू- ना.छगन भुजबळ


पश्चिमसमुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या आ.आशुतोष काळेंच्या प्रस्तावाला पाठिंबा देवू- ना.छगन भुजबळ

कोपरगाव येथे गोदावरी डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलतांना नामदार छगनराव भुजबळ समवेत  आ. आशुतोष काळे, अधिक्षक अभियंता श्रीम.अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, सभापती पोर्णिमा जगधने, पद्माकांत कुदळे आदी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आ.आशुतोष काळेंच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तने तीन देणार !

कोपरगाव विधानसभा मतदार संघाला आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने हुशार, अभ्यासू लोकप्रतिनिधी लाभले असून मतदार संघाच्या विविध विकास कामांबाबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे ८४ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले आहे. मंत्रीमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी पश्चिम समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी केलेल्या मागणीला नासिक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपला पाठिंबा राहील अशी ग्वाही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्ननागरी, पुरवठा ग्राहक मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांनी कोपरगाव येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत  दिली.

मागील सरकारच्या काळात मुंबई येथे होत असलेली कालवा सल्लागार समितीची बैठक आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्यांच्या रब्बी व उन्हाळा हंगाम सन २०२०/२१चे नियोजन संदर्भात डावा तट कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्ननागरी, पुरवठा ग्राहक मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे पार पडली याप्रसंगी ते बोलत होते.

तत्पूर्वी या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील विविध प्रश्नाकडे नामदार छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले. मागील पाच वर्षापासून कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे बैठक होत असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी कोणी वाली नव्हता. त्यासाठी हि बैठक लाभक्षेत्रातच व्हावी यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्या पाठपुराव्याला पाटबंधारे मंत्री नामदार जयंत पाटील यांनी सर्वस्वी अधिकार नामदार छगन भुजबळ यांना देऊन नामदार छगन भुजबळ यांनी डाव्या कालव्याची बैठक कोपरगाव व उजव्या कालव्याची बैठक राहाता येथे घेतल्याबद्दल लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले. ते म्हणाले कि, समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे. पश्चिम वाहिनी दमणगंगा, वैतरणा, अंबिका, नारपार व उल्हास या नद्यांचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी अतितुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून हा पाणीप्रश्न सोडवावा.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यातून एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले असले तरी उन्हाळी तीन आवर्तने द्यावी अशी मागणी केली. आवर्तनापूर्वी सर्व वितरिका व चाऱ्यांची सफाई सुरु करावी. आवर्तनाची लाभक्षेत्रातील टेल पासून हेड पर्यंत सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तन मिळावे.कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाला माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले.

त्याबाबत नामदार छगनराव भुजबळ म्हणाले की, आमदार आशुतोष काळे कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत जे-जे प्रस्ताव दाखल करतील त्या सर्व प्रस्तावांना माझा नेहमीच पाठींबा राहील. कोपरगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या आमदार आशुतोष काळेंच्या विचारांशी सहमत असून हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळेंच्या प्रस्तावाला महाविकास आघाडी सरकार पाठींबा देईल. तसेच आमदार आशुतोष काळे यांनी मागणी केल्याप्रमाणे उन्हाळी तीन आवर्तने देण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण, एम.टी.रोहमारे, सोमनाथ चांदगुडे,संजय काळे,डॉ.अजय गर्जे,दत्तात्रय सिनगर,राजेश परजणे,अॅड.देव आदी शेतकऱ्यांनी या बैठकीत आपल्या समस्या मांडल्या.     

यावेळी आमदार आशुतोष काळे, अधिक्षक अभियंता श्रीम.अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जी.प.सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ.विमलताई आगवण, सौ.सोनालीताई रोहमारे, सौ.सोनालीताई साबळे, पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, जीनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, अशोक खांबेकर, संतोष गंगवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील पाच वर्षात गल्लीपासून-दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र सत्तेचा दुरुपयोग करून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी बैठक मुंबईला घेणाऱ्या माजी आमदारांना रस्त्यावर निवेदन देण्याची दुर्दैवी वेळ आली- पद्माकांत कुदळे.


           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News