ऑनलाईन मार्केटने बाजारपेठ पडलीय ओस !!


ऑनलाईन मार्केटने बाजारपेठ पडलीय ओस !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

पूर्वी दिवाळी म्हटली की  प्रत्येक घरात हमखास कपडे व विविध वस्तूंची खरेदी व्हायची आणि प्रत्येक गावची बाजार पेठ फुलून जायची मात्र सद्या ऑनलाईन मार्केट व खरेदी मुळे बाजार पेठ ओस पडलीय. 

एका बाजूला आपल्या खिशात पैसे असो वा नसो मात्र आपल्या ओळखीचा दुकानादार उधारीवर वस्तू देऊन ग्राहकांची पत सांभाळत होता,दसरा दिवाळी म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत कोणती ना कोणती वस्तू खरेदी केली जायची 

दिवाळी पूर्वी खरीप पिकाची बाजारात विक्री करून शेतकऱ्यांच्या हातात पैसे यायचे तर दुसरी कडे नोकरदार वर्गाकडे दिवाळी बोनस मुळे अनेकांच्या हातात दोन पैसे यायचे आणि दिवाळी पूर्वी किराणा दुकानदार, कापड दुकानदार यांच्या वर्ष भराच्या उधाऱ्या देऊन पुन्हा नवीन खाते सुरू व्हायचे माहेरवासीन माहेरला आल्यानंतर तिची खरेदी मग साडी मुलांचे,कपडे साज शृंगाराचे समान असो की काचेच्या बांगडया मात्र या साऱ्या मुळे गावोगावच्या बाजार पेठा फुलून जायच्या आणि सर्वसामान्य ग्राहका कडून आलेले चलन फिरून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे,

 मात्र सद्या ऑनलाईन मार्केट मुळे ग्राहक स्वतः मालाची निवड करून मोबाईल कपडे,चप्पल व विविध चैनीच्या वस्तू खरेदी करताना दिसतात कधी कधी ब्रँडेड च्या नावाखाली फसवणूक देखील होते तरीही ऑनलाईन बुकींग केलेल्या

या वस्तू वितरित करण्यासाठी मोठया प्रमाणात नेमलेल्या डिलिव्हरी बॉय यांची सकाळी सुरू असलेली गडबड आपल्याला पहायला मिळते  दुसरीकडे दिवाळी ऐन आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना बाजार पेठेतील शांतता निश्चित विचार करायला लावणारी आहे

याउलट कपडे खरेदी साठी कोपरगाचा ग्राहक येवला किंवा संगमनेर येथे जाणे पसंत करतो नाहीतर मग नाशिक किंवा अहमदनगर या सारख्या मोठ्या शहरात उभारलेल्या मॉल मध्ये वस्तू खरेदी करायला पसंती देतात. या सर्व गोष्टींचा आपणच विचार करायला हवा अन्यथा भविष्यात स्थानिक बाजारपेठा ओस पडणार हे निश्चित !

जाहिरात
Search
विडिओ
Recent News