पाटबंधारे विभागाने पिकांना बारमाही पाणी द्यावे !!


पाटबंधारे विभागाने पिकांना बारमाही पाणी द्यावे !!

माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांची अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार.छगन भुजबळ यांचेकडे मागणी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांना उन्हाळी चार आवर्तने आणि रब्बीची तीन अशी सात आवर्तने देण्यात यावी तसेच टेलपर्यंतच्या शेतक-यांच्या शेतात पाणी पोहचवण्यासाठीच्या कालव्यांचे रखडलेले काम पुर्ण करून चा-यांची दुरूस्ती करण्यात यावी, अपु-या कर्मचा-यामुळे कामात सातत्याने येणारा विस्कळीतपणा टाळण्यासाठी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांचेकडे केली आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज कोपरगाव दौ-यावर असलेले नामदार छगनराव भुजबळ यांची भेट घेउन वरील मागण्या मांडल्या. कोपरगाव मतदार संघातून जाणा-या गोदावरी कॅनाॅलची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली असुन सुमारे १०० वर्षापेक्षा अधिक आयुर्मान झालेले असल्याने या कालव्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे.वारंवार कालवे फुटल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. शासनाच्या यांत्रिकी विभागाच्या मशिन मागवून तसेच लोकसहभागातून जानेवारी २०१९ मध्ये  सदर कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे, या कामासाठी  तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन विभागाकडून ५० लाख रूपयाचा निधी मंजुर केलेला आहे,तो निधीही या कामासाठी तातडीने देण्यात यावा.तसेच

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या शेतापर्यंत जाणा-या चा-यांची अवस्था खुपच बिकट झाली असल्याने त्याही दुरूस्त करण्याची आवश्यकता आहे सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतक-यांच्या अडचणीत भर पडली आहे. या काळात मोठी आर्थिक हानी झालेली आहे. त्याचबरोबर या आर्थीक परिस्थीतीतून मार्ग काढत त्यांनी पिके उभी केली,परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलेली पिकेही वाया गेल्याने शेतक-यांना मोठा आर्थीक फटका बसला. त्यामुळे शेतक-यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे, त्यामुळे या परिस्थीतीत शेतक-यांनी सात आवर्तने दयावी, बारमाही पिकाला पाणी दयावे, तसेच पाटबंधारे विभागाने जाहीर प्रगटन प्रसिध्द करून सात नंबरच्या अर्ज मागणीचा कालावधी कमी असल्याने त्या अर्ज मागणीची मुदत वाढवून द्यावी. अशा विविध मागण्या सौ कोल्हे यांनी यावेळी मांडल्या.

यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष शरदराव थोरात, सहकार महर्षी शकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, बाजार समितीचे संचालक बापुसाहेब सुराळकर, पंचायत समितीचे माजी सभापती मछिंद्र केकाण,सुनिल देवकर दादाहरी पोळ, सचिन कोल्हे, दिनेश कोल्हे, ,संदीप देवकर अतुल सुराळकर, चंद्रभान रोहोम, कैलास खैरे,भाजपा अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, शहराध्यक्ष दत्ता काले, सतीश केकाण,अशोक भनगडे,  संतोष भागवत, एकनाथ अनर्थे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News