शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत राज्यातील सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येते अशाच पुरस्कारासाठी सावळीविहीर,शिर्डी येथील अमर प्रकाश झिंजुर्डे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आला आहे.मानाचा फेटा,मानकरी महावस्त्र,गौरव पदक,सन्मानचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.अमर झिंजुर्डे हे चर्मकार विकास संघ उत्तर अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष पदावर असून सा. स्वराज्याचा जाहीरनामा चे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.तसेच अमर झिंजुर्डे हे संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक आहेत.त्यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट असल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.या पुरस्कारा बद्दल त्यांचे,राहाता तालुका कृषिबाजार समितीचे उपाध्यक्ष श्री,बाळासाहेब जपे,पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दूनबळे , सामाजिक कार्यकर्ते गणेश आगलावे,अमरदीप संघटना, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,.अमर झिंजुर्डे यांना या कार्याबद्दल सा. स्वराज्याचा जाहीरनामा या परिवारातील सर्व प्रतिनिधी तसेच चर्मकार विकास संघ यांच्यातर्फे अमर झिंजुर्डे यांचे अभिनंदन करुनव पुढील वाटचालीस सदिच्छा देण्यात आल्या आहेत