विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात यावी तसेच पालकाच्या उत्पन्नाच्या अटीची मर्यादा वाढवण्यात यावी-गौतम कांबळे


विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात यावी तसेच पालकाच्या उत्पन्नाच्या अटीची मर्यादा वाढवण्यात यावी-गौतम कांबळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात यावी व पालकाच्या उत्पन्नाच्या अटीची मर्यादा वाढविण्यात यावी -गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी  यांची मागणी याविषयी सविस्तर माहिती देताना  गौतम कांबळे  म्हणाले की मा .नामदार वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे .या निवेदनातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत .

सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता योजना (विशेष घटक व इतर घटक )सध्या असलेली  दर दिवशी एक रुपया ही रक्कम अत्यंत तोकडी असून मुलींना दर दिवशी दहा रुपये रक्कम देण्यात यावी .ही योजना राबवताना दारिद्र्यरेषेच्या कार्डची अट रद्द करण्यात यावी .

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक सहा हजार रुपये करण्यात यावी .सध्या सहाशे रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते .महागाईचा विचार करता ही रक्कम अत्यंत अपुरी आहे . माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर वर्षी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात यावी .

शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या जागांचा अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून भरण्यात यावा .

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना विशेष बाब म्हणून संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी डिसेंबर 2020पर्यंत देण्यात यावी .उशिरा संगणक अहर्ता परीक्षा पास झाल्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच निवड श्रेणीची फरक बिले अदा करण्यात आलेली नाहीत . ती तात्काळ देण्यात यावीत .

दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळणे आवश्यक आहे . त्यामुळे वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नयेत .

covid-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यामुळे 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  शाळेत उपस्थित राहण्याचाआदेश रद्द करण्यात यावा .प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नयेत .

काही अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्थामधे शासनाने निर्धारित केलेल्या तासिकेपेक्षा अधिक वेळ वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या नावाखाली संस्थाप्रमुख शिक्षकांना मानसिक त्रास देऊन सक्तीने ज्यादा तासिका घेण्यास भाग पाडतात.ज्यादा तासिकेच्या अध्यापनाची सक्ती शिक्षकांवर करण्यात येऊ नये या सबंधीचे निर्देश संस्था चालकांना देण्यात यावे. 

खाजगी संस्थांना शासन सर्व प्रकारचे अनुदान देत असल्याने खाजगी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद )यांना देण्यात यावा .संस्था प्रमुखांचा बदल्या करण्याचा अधिकार रद्द करण्यात यावा .

अनेक संस्था प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा ठराविक रक्कम संस्थेला देण्याची सक्ती करतात व रक्कम न दिल्यास गैरसोयीची बदली करण्याची व गोपनीय अभिलेख खराब करण्याची धमकी देतात .त्यामुळे अनेक शिक्षक मानसिक दबावाखाली काम करत आहेत .शिक्षकांना मानसीक स्वाथ्य मिळण्यासाठी व आनंददायी वातावरणात अध्यापन होण्यासाठी खाजगी संस्था प्रमुखांचे बदलीचे अधिकार त्वरित रद्द करण्यात यावेत .

covid-19 चे काम करत असताना अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत .त्यांना 50 लाख विमा संरक्षण योजनेची रक्कम तात्काळ देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर प्राधान्यक्रमाने नोकरी देण्यात यावी . 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पोलीस विभागाप्रमाणे कॅशलेस आरोग्य सुविधा देण्यात यावी.

1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेले शिक्षक आणि इतर शासकीय कर्मचारी यांच्यावर लादलेली व गेली दहा वर्षे वादग्रस्त असणारी पेन्शन संदर्भित डीसीपीएस /एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी .

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह प्रवेश व वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसाठी पालकाच्या उत्पन्नाची मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे .मागण्याचे निवेदन मा .उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा .अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहे.यावेळी श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष .श्री गजानन थुल राज्य सरचिटणीस श्री आनंद खामकर अतिरिक्त महासचिव श्री दादा डाळिंबे जिल्हाध्यक्ष पुणे श्री चंद्रकांत सलवदे जिल्हा महासचिव पुणे श्री जयवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष पुणे हे पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News