पुणे व नगर जिल्हयात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे दोन बुकी जेरबंद ४ दिवसांची पोलीस कोठडी : मोठे रॅकेट उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची कारवाई


पुणे व नगर जिल्हयात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे दोन बुकी जेरबंद ४ दिवसांची पोलीस कोठडी : मोठे रॅकेट उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

- चंगळवादी तरुणांची नस ओळखूनच सट्टेबाज कशावरही सट्टा लावून तरुण पिढीला जाळ्यात ओढत आहेत,कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना दुबई येथे भारताची IPL क्रिकेट मॅच सुरू असून त्यावर पुणे आणि जिल्ह्यात कोण जिंकणार आणि कोण हरणार यावर लावणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे,दुबई येथे सुरू असलेल्या बेंगलोर व हैद्राबाद यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी या सामन्यावर शिरूर सी.टी. बोरा कॉलेज शेजारील मैदानात स्वत:चे अर्थिक फायदयासाठी मोबाईल फोन तंत्राचा क्रिकेट बेटींग जुगार करीता गैरवापर करून क्रिकेट मॅचच्या हार जीतवर मोबाईलव्दारे सट्टा चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळाली होती. त्याबाबत कारवाई करणेबाबत त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते . त्याप्रमाणे दि.३१ ऑक्टोबर २०२० रोजी सदर ठिकाणी छापा टाकून सट्टा लावताना व घेताना निष्पन्न झालेले आरोपी १)सुरज अभय गुगळे रा.शिरूर वाडा कॉलणी ता.शिरूर जि.पुणे २)अदित्य दिलीप ठाकुर वय २५ वर्षे रा.अदीनाथनगर शिरूर ता.शिरूर जि.पुणे यांचेवर तसेच बेटींग घेणारा अहमदनगर येथील बुकी ३)प्रकाश जोशी असे तिघांवर दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली होती.

       प्राथमिक तपासात सदर गुन्हयाची व्याप्ती ही दोन जिल्हयात असल्याने व त्यामध्ये आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला होता. तसेच सट्टा घेणारे मुख्य सुत्रधार शोधून त्यांचेवरही कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

     त्याप्रमाणे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड, उमाकांत कुंजीर, निलेश कदम, जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, अक्षय जावळे, दगडू विरकर यांचे पथकाने माहिती काढून दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी फरारी निष्पन्न बुकी प्रकाश देवीलाल जोशी वय ४८ रा.प्रेमदान चौक, सावेडी, अहमदनगर मूळ रा.देहराडून, उत्तराखंड व त्याचेकडून बेटींग घेणारा मुख्य सुत्रधार मोहन मथुरादत्त जोशी वय ४८ रा.प्रेमदान चौक, सावेडी अहमदनगर मूळ रा.नैनिताल, उत्तराखंड यांना अहमदनगर येथून ताब्यात घेतलेले आहे. सदर दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून तपासकामी त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळणेसाठी मे.शिरूर कोर्ट येथे हजर केले असता मे.कोर्टाने ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.

      पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपींकडून गुन्हयाचे  अनुषंगाने मुद्देमाल हस्तगत करणे तसेच सट्टा घेणारे आणखीन कोणी बुकी अगर मोठे रॅकेट आहे काय? याबाबतचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

     यातील बुकी आरोपी मोहन जोशी याचेवर यापूर्वी सट्टा प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News