दारुचे नशेत केला मित्राचा खुन, 8 तासात सिन्नर येथुन 03 आरोपींच्या आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्त कामगिरी


दारुचे नशेत केला मित्राचा खुन, 8 तासात सिन्नर येथुन 03 आरोपींच्या आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्त कामगिरी

विठ्ठल  होले  विशेष प्रतिनिधी :तळेगाव MIDC मध्ये जुन्या वादाचा राग मनात धरून तीन मित्रांनीच केला मित्राचा खून,गुन्हे शाखा युनिट 5 व तळेगाव MIDC पोलिसांनी 8 तासात तीनही आरोपींना केली अटक, दि 05/11/2020 रोजी रात्री 10.10 वाजणेचे सुमारास तळेगाव एम.आय.डी.सी. हद्दीतील मौजे इंदोरी गावातील कॅडबरी कंपनीचे समोर तरुण नामे गुरुदास उर्फ पिल्या सदाशिव तेलंग हा त्याचे दुचाकीवर जात असताना त्याचे मित्र बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे सर्व रा इंदोरी यांनी जुण्या वादाचे कारणावरुन धारधार शस्त्राने त्याचे चेहऱ्यावर व गळयावर गंभीर जखमा करुन खुन केला असलेबाबत मयताचा भाऊ अमर सदाशिव तेलंग याने तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे यांचेविरुध्द तक्रार दिली.

सदरबाबत तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 124/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सांवत, गुन्हे शाखा, युनिट 5 यांनी पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, राजेंद्र साळुंके, धनराज किरनाळे, श्यामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर यांचे एक तपास पथक व श्री प्रदिप लोंढे, तळेगाव एम.आय.डी.सी. यांनी पोउपनि श्री राहुल कोळी, पोलीस अंमलदार प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर, नंदकुमार चव्हाण, शंकर चिंचकर व नितीन तारडे यांचे एक तपास पथक असे आरोपीतांचा शोध घेणेकामी वेगवेगळी दोन तपास पथके तयार करुन त्यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. 

सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे व पोलीस अंमलदार नागेश माळी, मयुर वाडकर यांनी त्यांना आरोपीबाबत मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे हे एका दुचाकी वाहनाने नाशिकचे दिशेने गेले असल्याचे समोर आले. मिळालेली माहिती वरील तपास पथकास सांगुन त्यांचे संपर्कात राहुन आरोपींबाबत वेळोवेळी माहीती देवुन त्यांना आरोपींचे मागावार नाशिक दिशेने पाठविण्यात आले. 

तपास पथकाने आरोपींची माहिती मिळालेनंतर आरोपी पळुन जात असताना आरोपींचा 175 कि.मी. पाठलाग करुन अवघ्या 08 तासात सिन्नर जि नाशिक येथुन ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे विचारपुस केली असता आरोपी नामे देवेंद्र जाधव व मयत गुरुदास उर्फ पिल्या तेलंग यांच्यात वर्षभरापुर्वी भांडण झाले होते त्याचा राग मनामध्ये धरुन गुरुदास उर्फ पिल्या तेलंग याचा खुन करुन लपण्याकरीता नाशिक येथील मित्राकडे जात असल्याचे सांगितले. 

आरोपी नामे 1. देवेंद्र नाना जाधव, वय 23 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे 2. मयुर उर्फ नच्या अभिमान शिंदे, वय 21 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे 3. शुभम संजय भापकर, वय 21 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे यांना तळेगाव एम.आय.डी.सी. गु.र.क्र. 124/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 34 अटक करण्यात आली असुन पुढील तपास तळेगाव एम.आय.डी.सी. कडील पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02 श्री आनंद भोईटे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री संजय नाईक-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, तळेगाव एम.आय.डी.सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदिप लोंढे, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळी व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, राजेंद्र साळुंके, धनराज किरनाळे, श्यामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर नागेश माळी, मयुर वाडकर, प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर, नंदकुमार चव्हाण, शंकर चिंचकर, नितीन तारडे, राजेंद्र शेटे, संदिप ठाकरे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, गणेश मालुसरे, फारुक मुल्ला, भरत माने, राजकुमार इघारे, नितीन बहिरट, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News