तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाजतील ऑनलाईन सातबारा व ई फेरफार सर्व्हर त्रुटी दुरूस्त करण्याची मागणी !!महाराष्ट्र राज्य तलाठी संघांचे तहसिलदारांना निवेदन.


तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाजतील ऑनलाईन सातबारा व ई फेरफार सर्व्हर त्रुटी दुरूस्त करण्याची मागणी !!महाराष्ट्र राज्य तलाठी संघांचे तहसिलदारांना निवेदन.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -आज दिनांक ०६/११/२०२० रोजीमहाराष्ट्र राज्य तलाठी संघांचे जिल्हा अध्यक्ष व मंडलाधिकारी कोपरगाव भुजबळ ज्ञानदेव व  सर्व तलाठी कोपरगाव यांनी माननीय तहसीलदार योगेश चंद्रे साहेबांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ऑनलाईन सातबारा व ई फेरफार सर्व्हर हा मागील दोन महिन्यांपासून स्पीड नसल्याने तसेच बहुतांशी वेळा बंद असल्याने तलाठी यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे सर्व्हर रोज सकाळी कार्यालयीन वेळेस ११:३० ते सायंकाळी ५:०० वा. पर्यंत बंदच असतो त्यामुळे शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयाशी संबंधित कामे रेंगळी असुन तलाठी यांचे तेच तेच उत्तर ऐकून आता खातेदार यांची काहीही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही.त्यामुळे तलाठी व मंडलाधिकारी यांच्या सोबत खातेदारांची सतत वादाची परिस्थिती उद्भवत आहे. सर्व तलाठी व मंडलाधिकारी मानसिक तणावाच्या स्थितीत आहे त्यामुळे ई फेरफार संबंधित कामकाज मोठ्या प्रमाणावर बंद राहतात.तरी तलाठी संघटनेकडून या निवेदनाद्वारे सर्व्हर स्पीड बाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करून सदर समस्या कायम स्वरुपी सोडवण्या बाबत उपाय योजना करावी अशी विनंती माननीय तहसीलदार साहेब यांना करण्यात आली आहे. हे निवेदन देताना अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व मंडळ आधिकारी कोपरगाव श्री भुजबळ ज्ञानदेव ,तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष बडदे बी बी तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व तलाठी यांच्या सही निशी व उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News