मौजे- चांदेकसारे ग्रामपंचायतीचे सुचनेनंतर गायत्री कंपनीने केला रस्ता दुरुस्तीस प्रारंभ !!


मौजे- चांदेकसारे ग्रामपंचायतीचे सुचनेनंतर गायत्री कंपनीने केला रस्ता दुरुस्तीस प्रारंभ !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

मौजे चांदेकसारे ग्रामपंचायतीचे सुचनेनुसार समृद्धी महामार्गाचे काम करत असलेल्या गायत्री प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने चांदेकसारे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदीर ते शिर्डी -सिन्नर या जोडरस्त्याची खड्डे बुजविणे, कंपनीच्या अवजड वहानांच्या वर्दळीने उडणाऱ्या धुळीने प्रदुषण होउ नये यासाठी दिवसातुन दोन वेळा रस्त्यावर पाणी मारणे या दुरुस्ती कामास आज प्रारंभ झाल्याची माहीती माजी सरपंच केशवराव होन यांनी दिली

समृध्दी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासुन चांदेकसारे पंचक्रोशीतील मुख्यरस्ते व शिव रस्त्यांची दैनियअवस्था झाली आहे. वांरवार तक्रार करून ही वेळेत रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याच्या तक्रारी माजी सरपंच केशवरावे होन यांचा पर्यत आल्याने ग्रामपंचायतीचे माध्यमातुन कंपनीस सुचना केल्यानंतर सदर कामास प्रारंभ झाला असुन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केशवराव होन यांचे आभार मानले आहे.

सदर प्रसंगीश माजी सरपंंच श्री.केशवराव होन,कांतीलाल  होन ,चांदेकसारे गावचे ग्रामस्‍थ व गायञी प्राजेक्‍ट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News