गुन्हे शाखा युनिट 2 ने सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला सोडवले सुखरूप,8 तासाचा अपहरण थरार


गुन्हे शाखा युनिट 2 ने सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला सोडवले सुखरूप,8 तासाचा अपहरण थरार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 पिंपरी चिंचवड -आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले की राजेंद्र वाघमारे वय 38 या व्यक्तीला त्याच्या दुकानातून  वाल्हेकर वाडी चिंचवड येथून अज्ञात लोकांनी बोलोरे गाडीतून जबरदस्तीने उचलून अपहरण करून मुंबई च्या दिशेने गेले असल्याचे कळवले,गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी स्टाफसह  तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता राजेंद्र बन्सी वाघमारे हे पत्नी आणि दोन मुलांसह सदर र ठिकाणी राहनेस असून त्यांचा टेलरिंग चा व्यवसाय आहे, 3/11/20 रोजी सकाळी दुकान उघडत असताना एक बोलोरे गाडी MH 25 R 2243 ही अचानक येऊन थांबली आणि काही कळायच्या आत वाघमारे यांना जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले अशी माहिती त्यांचा कामगार बापू चिंचलवाड  याने त्यांची पत्नी पार्वती वाघमारे यांना सांगितली त्यानुसार त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनला कळविले होते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी त्याची माहिती घेतली असता वाघमारे यांनी बीड जिल्हा  येथून एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते त्या व्यक्तीनेच पैशासाठी अपहरण केले असावे असे सांगितले,त्यातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला त्यानुसार सायबर क्राईम विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक  राहुल नाईक यांच्याकडून मोबाईल लोकेशनची माहिती घेतली असता सदर आरोपी बीड जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याचे समजले ,व पो नि शैलेश गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार,पोलीस नाईक जयवंत राऊत,कॉन्स्टेबल नामदेव राऊत,नामदेव कापसे यांचे एक पथक तयार करून बोलोरे गाडीच्या मागावर पाठवले,पो उप नि संजय निलपत्रेवार यांनी सायबर क्राईमचे सपोनि राहुल नाईक पोलीस अंमलदार नागेश माळी यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून तांत्रिक माहिती घेत लोकेशनवर गाडीचा  पाठलाग सुरू ठेवला अथक आठ तासांच्या प्रयत्नानंतर बीड जिल्ह्याच्या नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर बोलोरे गाडी क्रमांक  MH 25 R 2243 ही  भरधाव वेगाने जात असताना त्या गाडीला गाडी आडवी लावून अपहरण झालेल्या राजेंद्र वाघमारे यांची सुखरूप सुटका करून, पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले, त्यामध्ये आरोपी नंबर 1) गहिनीनाथ बबन कडवकर वय 32 धंदा शेती राहणार बाळापूर पोटारा तालुका जिल्हा बीड,2)अनिल धनराज तांदळे वय 32 धंदा शेती राहणार अंबिल वडगाव पो पोथरा ता जिल्हा बीड,3)हनुमंत बन्सी पायाळ वय 45 धंदा शेती  4)भाऊराव लहू तांदळे वय 37 धंदा शेती दोघे राहणार अंबिल वडगाव पो पोथरा ता जिल्हा बीड,5)बाळू ज्ञानोबा तांदळे वय 23 धंदा शेती राहणार तांदळयाची वाडी पो येळमघाट ता जिल्हा बीड अशी नावे आहेत, त्यांनी आर्थिक देवाण घेवणीतून हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे, सदर गुन्ह्याची माहिती पो उप नि निलपत्रेवार यांनी नेकनूर पोलीस स्टेशनला कळवून सदर आरोपींना चिंचवड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे,सदरची कारवाई पिंपरी चिंचवड चे आयुक्त कृष्णप्रकाश,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार,पोलीस नाईक जयवंत राऊत,कॉन्स्टेबल नामदेव राऊत,नामदेव कापसे,सायबर क्राईमचे सपोनि राहुल नाईक,नागेश माळी यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News