कर्मवीर शंकररावजी काळे यांना ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन


कर्मवीर शंकररावजी काळे यांना ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

-  मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा.आ. अशोकराव काळे, सौ. पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे,सौ. चैतालीताई काळे, मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, उपाध्यक्ष सुधाकर रोहोम आयांश काळे आदी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                 कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व उद्योग समुहावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.

          मागील आठ महिन्यापासून संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी माजीं आमदार अशोकराव काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,आमदार आशुतोष काळे,जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिकासौ. चैतालीताई काळे,जेष्ठ नेते छबुराव आव्हाड,अॅड.प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सर्व संचालक मंडळ,पंचायत समितीच्या सभापती सौ.पौर्णिमा जगधने, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य,रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,महाविद्यालयांचे प्राचार्य,शिक्षक वृंद, उद्योग समूह व सर्व सलग्नसंस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन,पदाधिकारी, शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व हितचिंतक सोशल डिस्टसिंगचे उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News