कोपरगावात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान !!


कोपरगावात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अखंडपणे महाराष्ट्र भर सुरू आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात देखील उत्तरनगर जिल्हाप्रमुख मा.श्री. राजेंद्रजी झावरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,नगरसेवक, सरपंच,महिला आघाडी,वाहतूक सेना, अपंग सेना,एस टी कामगार सेना पदाधिकाऱ्यांच्या व तमाम शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणीचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातून प्रत्येकी तीस हजार सदस्यांची नोंदणी करून दाखवणार आहोत. तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव म्हणाले की सर्व सामान्य नागरिकांचा शिवसैनिकांवर विश्वास आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी कोपरगावातून करून दाखवू. 

प्रमोद लबडे म्हणाले की,शिवसैनिक हे नेहमीच सर्व सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी शिवसैनिक व्हावं. 

तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे म्हणाले कि राजकीय कामापेक्षा सामाजिक कामात शिवसैनिक सतत आग्रेसर असतात त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग घेऊन सामाजिक कार्य करावे. 

शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियालय म्हणाले कि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कोपरगावात जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली तीस हजार सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा निश्चितच आम्ही निश्चित

पार करू अशी ग्वाही देतो. 

एस टी कामगार सेना शहरप्रमुख भरत मोरे म्हणाले आज संपूर्ण देशाला शिवसैनिकांची गरज आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये या आणि सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करा. 

या वेळी विधानसभा संघटक अस्लम शेख, युवासेना सहसचिव सुनिल तिवारी, एस टी कामगार सेना जिल्हाप्रमुख किरण बिडवे, मुन्ना आव्हाड,बाळासाहेब जाधव,सरपंच संजय गुरसळ,अशोक कानडे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,माजी नगरसेवक अतुल काले,नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, किरण खर्डे, युवा नेते विक्रांत झावरे,मुन्ना मन्सुरी, दिलीप अरगडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,भूषण पाटणकर, गोपाळ वैरागळ,आकाश कानडे, गगन हाडा, संघटक नितीन राऊत, बाळासाहेब साळुंके, सह संघटक वैभव गिते, सागर जाधव, विभागप्रमुख रफिक शेख, विजय शिंदे, दिपक बरदे,मयुर दळवी,समीर शेख,सौरभ गायकवाड, किरण गायकवाड,राहुल हस्वाल,शैलेश वाघ, रामदास शिंदे,किरण अडांगळे, विजय सोनवणे,वाहतूक सेनेचे पप्पू पेकले, जाफर सय्यद, प्रवीण शेलार,राहुल देशपांडे, सतीश शिंगाने,व्यापारी सेनेचे योगेश मोरे, विशाल झावरे, सुमित बिडवे,पप्पू देशमुख,सनी डहांके,अविनाश वाघ, वैभव हलवाई,निशांत झावरे,किरण आसने, सागर,योगेश जगताप, गुरमित दडियाल, सचिन आसने, कृष्णा बोरावके,आगलावे,कृष्णा दळवी, आदित्य निकुंभ, मोनु म्हसे,बंटी दारुंटे,जूबेद अत्तर रितेश राऊत,सुशील धाडीवाल, नरेश बैरागी,दिपक दळे,पिंटू बोर्डे,कल्पेश मंडलिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News