संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
दि.5 रोजी काकडी तालुका कोपरगाव येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम,माती परीक्षण प्रशिक्षण कार्यक्रम व बीज प्रक्रियेचे महत्व याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री अशोक आढाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये श्री आढाव साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य कसे राखावे व पिकानुसार कोणती खते वापरावी जिवाणू व सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा बीज प्रक्रियेचे फायदे कसे होतात. याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी अथर्व ऍग्रो ऑरगॅनिक नाशिकचे मॅनेजर श्री प्रशांत आढाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अथर्व बीज प्रक्रिया किटचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच रियल ॲग्रो सर्व्हिसेस सावळीविहीर चे संचालक श्री.राहुल होन यांच्यातर्फे उपस्थित शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करून अथर्व बीज प्रक्रिया किटचे वितरण करण्यात आले यावेळी माधुरी गावडे मॅडम मंडळ कृषी अधिकारी पोहेगाव, कृषी पर्यवेक्षक भोसले साहेब, कृषी सहाय्यक दिनकर कोल्हे साहेब,तायडे मॅडम तसेच काकडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.