कुरकुंभ येथे दुधाचे कँनमध्ये ताडी वाहतूक करणारा पिकअप पुणे L C B च्या ताब्यात :स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


कुरकुंभ येथे दुधाचे कँनमध्ये ताडी वाहतूक करणारा पिकअप पुणे L C B च्या ताब्यात :स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी: स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथकाने दि.०४/११/२०२० रोजी दौंड पोलिस स्टेशन हद्दीत कुरकुंभ येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास मिळालेल्या माहिती नुसार एक इसम आपले पिकअप गाडीमध्ये ताडी वाहतूक करत असताना मिळून आला. त्याचे कब्जात प्लास्टिक दुधाचे कॅनमध्ये ४० लिटर ताडीचे ५ व एक प्लास्टिक टाकी विक्री साठी वाहतूक करताना मिळून आला त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश शामराव भंडारी वय.३२रा. रणगाव ता.इंदापूर जि.पुणे ताडी वाहतूक करत असताना मिळून आला त्याचे  ताब्यातून एक पांढरे रंगाची महीद्र बोलेरो  पिक अप गाडी किंमत अंदाजे ५ लाख रुपये तसेच एक टाकी व  ५ दुधाचे कँन्ड  ४५० लिटर मापाचे  किंमत अंदाजे १४५०० रुपये असा एकूण ५ लाख १४ हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपी विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अप्पर पोलिस अधीक्षक बारामती, उपविभागीय अधिकार राहुल धस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवाजी ननावरे, पो. हवा सचिन गायकवाड,पोहवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो.ना गुरू गायकवाड, पो.ना सुभाष राऊत, पो.ना अभिजीत एकशिंगे कुरकुंभ चे पोलीस अधिकारी, मारुती हिवरे, अमोल राऊत, दत्तात्रय चांदणे, महेश पवार यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News