शिक्षणमहर्षी माजी खासदार मा.शंकररावजी काळेसाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त !!


शिक्षणमहर्षी माजी खासदार मा.शंकररावजी काळेसाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त !!

वार्ताकन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

दि.५नोव्हेंबर शिक्षणमहर्षी माजी खासदार शंकररावजी काळेसाहेब यांचे ७ वे पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या स्मृती प्रथम विनम्र अभिवादन. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व कष्टकरी कुटुंबार्पयत शिक्षणाची गंगा पोहचवणारे भागिरथ म्हणजे आदरणीय काळेसाहेब.

सामान्य शेतकरी कुंटुबात जन्मलेल्या साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब जनेतेच्या उद्धारासाठी खर्ची केले राजकारणातुन समाजकारण करत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाठी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. तालुक्याला आपल्या हक्काच पाणी मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई.आंदोलने मोर्चे असे अनेक पर्याय वापरून अखेरचा श्वासापर्यंत लढा दिला.

जिल्हा परीषद अध्यक्ष ते संसद सदस्य या प्रवासात साहेबांनी अनेक लोककल्याणकारी कामे करताना भुमिहीनांना जमीनी मिळवुन दिल्या तसेच कॉग्रेस सत्तेच्या काळात गोर गरीबांना घरे बांधुन दिली गोरगरीब जनेतेची सेवा करत असताना, दि.५ नोव्हेंबर२०१२रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या समाजसेवकाचा स्मृतीस विनम्र अभिवादन.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News