केमिकलयुक्त रासायनिक कचरा मुख्य चौकात सांडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली:प्रशासनाचे दुर्लक्ष


केमिकलयुक्त रासायनिक कचरा मुख्य चौकात सांडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली:प्रशासनाचे दुर्लक्ष

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी: 

कुरकुंभ औद्यागिक वसाहतमधील ऑनर लॅब कंपनीपासून ते एम.आय.डी.सी मुख्य चौकापर्यंत असा अर्ध्या कि. मीटरपर्यंत कंपनीतून निघणारा केमिकल युक्त अतिघातक कचरा वाहतूक करताना वाहतूक करणाऱ्या गाडीतून पडला. मंगळवारी (िद. ३ नोव्हेंबर) दुपारी हा प्रकार घडला.

ठेकेदाराची बेिफकीरी : कुरकुंभ एमआयडीसीतील मुख्य चौकातच सांडला कचरा

कुरकुंभ : कुरकुंभ औद्यागिक वसाहतमधील ऑनर लॅब कंपनीपासून ते एम.आय.डी.सी मुख्य चौकापर्यंत असा पाचशे मीटरपर्यंत कंपनीतून निघणारा केमिकल युक्त अतिघातक कचरा वाहतूक करताना वाहतूक करणाऱ्या गाडीतून पडला. तो

अपघात असल्याने कारवाई करण्यात आली नाही.

-सूर्यकांत शिंदे, अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून ओळखली जाते. या औद्यागिक वसाहतीतील कंपन्यामध्ये कंपनीतील केमिकल युक्त घनकचरा, वेगवेगळ्या केमिकलवर प्रक्रिया करून निघणारे केमिकलयुक्त पाणी, अॅसिडवर प्रक्रिया करून कंपनीच्या ईटीपीमधून निघणारा अतिघातक कचऱ्याची रांजणगाव या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. हा घन कचरा एमआयडीसीमधून बंिदस्त गाडीतून पाठिवला जाताे. परंतु संबंधित गाडीला माघील बाजूस असणाऱ्या फाळके निघाल्याने कंपनीतून गाडी बाहेर आल्यानंतर काही अंतरावरच या गाडीतून केमिकलयुक्त अतिघातक कचरा औद्याेगिक वसाहतीच्या मुख्य चौकातच गाडीमधून पडला. त्यामुळे या चौकात दुर्गंधी पसरली होती. पडलेला केमिकलयुक्त कचरा नागरिकांच्या, कामगारांच्या हाता, पायाला लागून आरोग्याला धोका होऊ शकतो. हा रासायनिक कचरा वाहतूक करण्यापूर्वी वाहतूक करणारी गाडी बंिदस्त नेली पाहिजे. परंतु असं होतं नसल्याचं दिसत आहे. संबंधित ठेकेदाराकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News