कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये साडे सहा लाखाचा बेकायदा मद्यसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई


कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये साडे सहा लाखाचा बेकायदा मद्यसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

सुरेश बागल, दौंड प्रतिनिधी:

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात पुणे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पुणे सोलापूर महामार्गाच्या उडडाण पुलाच्या उजव्या बाजूस मुकादमवाडी येथे छापा टाकून विविध ब्रँडचे 20 बॉक्स असे एकूण 30 सीलबंद बॉक्स (256.34 ब,ली ) वाहनासह एकूण सहा लाख २१ हजार ५६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक  ए. जी. बिराजदार यांनी दिली. दरम्यान हा बेकायदा मद्यसाठा गोव्या राज्यातून चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणला असल्याचे उघड झाले आहे.   

      विशाल सतीश जगताप (वय २७, रा,मुकदमवाडी पांढरेवाडी , कुरकुम एमायडिसी ता.दौंड जि.पुणे ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने रविवार व सोमवारी ( दि.2) दरम्यान मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. कुरकुंभ एमआयडीसी परिसरात बेकायदा मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास (क्रमांक 2 )  मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने कुरकुंभ एमआयडीसी परिसराताल मुकादम वाडी येथे छापा छापा टाकला असता आरोपीच्या घरासमोर पांढरा रंगाची महिंद्रा कंपनी ची स्कार्पिओ वाहन क्रमांक ( एम. 

एच.12 एच झेड 5454)  ही चारचाकी वाहन उभे असल्याचे दिसले, सदर वाहनाच्या खिडकीच्या काचेतून पाहिले असता त्यामध्ये बेकायदा मद्याचे बॅाक्स असल्याचे दिसून आले. त्यात गोवा राज्यात विक्रीस असलेले मॅकडॉल्स नंबर १ विस्की से १८० मिलिटरी समतेचे सात सीलबंद बॉक्स व इंपेरियल ब्लू विस्की चे  १८० मिलीलीटर क्षमतेचे तीन सीलबंद बॉक्स गाडीच्या सीटवर दिसून आले, सदर बॉक्स उघडून बाटलीची पाहणी केली असता सर्व मद्यसाठा हा गोवा राज्यात विक्री असलेले असल्याचे दिसून आले. आरोपीने राहत्या घराशेजारील जुन्या पडक्या खोलीमध्ये आणखी बेकायदेशीर मद्यसाठा असल्याचे कबूल केले सदर मालकीच्या घराच्या जुन्या पडक्या घराच्या खोलीची तपासणी केली असता सदर खोलीत विविध ब्रँडचे 20 सिलबंद बॉक्स , असे एकूण तीस सील बंद बॉक्स (256,34 ब,ली.) मिळून आले. वाहनासह असा एकूण सहा लाख 21 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.     ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, पुणे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे ( भरारी पथक क्रमांक दोन )  पुणे निरीक्षक ए. जी. बिराजदार, दुय्यम निरीक्षक विकास थोरात, एस के कानेकर, सतीश इंगळे, प्रशांत धाईंजे, जवान एच.बी.मांडेकर , नवनाथ पडवळ, केशव वामने, बी आर सावंत व महिला जवान श्रीमती मनीषा भोसले आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक ए.जी बिराजदार करीत आहे. दरम्यान, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्र राज्यात विक्री झाल्यास शासानाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते. या भरारी पथकाने यापुर्वी असे अऩेक चोरट्या मार्गाने आणलेला बेकायदा मद्यसाठा जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामुळे शासनाच्या महसलूची मोठी हानी टळली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News