गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम !!


गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुबई यांचे वतीने २०२० मध्ये कोविड १९ मुळे ऑनलाईन   घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष  पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुच्या परीक्षेचा सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेऊन १००% निकाल लागला आहे.  महाविद्यालयात शिंदे समाधान बाळासाहेब  ह्याने ९८.११% गुण मिळवुन प्रथम आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.

तृतीय वर्षाचा एकूण शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.समाधान बाळासाहेब शिंदे ९८.११%, तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक, काळोखे अनिल भाऊसाहेब ९६.८८ %, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु. श्रद्धा सुरेश चांदगुडे ९३.४३%, सिव्हील विभागात प्रथम क्रमांक चि. सुरज रंगनाथ कोल्हे ९१.०० %, तृतीय वर्ष अॅटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक चेतन रामनाथ शिंदे ८५.२७  याने मिळविला आहे.

      महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ. चैतालीताई काळे,सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे,तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,प्राचार्य सुभाष भारती सर प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News