भविष्य निधी निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला...नूतनीकरणाबाबत आवाहन


भविष्य निधी निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला...नूतनीकरणाबाबत आवाहन

शिर्डी,राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी, येथील कर्मचारी भविष्य निधिसंगठन (ई.पी.एफ.ओ) तर्फे सर्व सदस्य, विधवा, विधुर, पेंशन धारकांना दरवर्षीप्रमाणे 1 नोव्हेंबर 2020 पासून आपला हयातीचा दाखला संगणकीय पध्दतीने बनविण्याचे आवाहन केले जात आहे. हयातीचा दाखला बनविण्यासाठी पेंशन धारकांचे आधार कार्ड, मोबाईल, पी.पी.ओ. नंबर आणि पेंशन बँक पासबुकसह आपल्या पेंशन वितरित करणा-या बँकेमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करुन घ्यावे किंवा आपल्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रामध्ये (सीएससी) आपले जीवन प्रमाणपत्र संगणकीय पध्दतीने तयार करावे. जेणेकरुन आपली पेंशन सुरळीतपणे मिळण्यास अडचण येणार नाही. जीवन प्रमाणपत्राची वैधता जीवनप्रमाणपत्र बनविण्याच्या तारखेपासून एक वर्षाची असेल, असे सहायक भविष्य निधी आयुक्त अभिषेककुमार मिश्र यांनी केले आहे.                            ***

जाहिरात
Search
विडिओ
Recent News