हयातीचा दाखला सादर करण्याबाबत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन


हयातीचा दाखला सादर करण्याबाबत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

 शिर्डी राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

: महाराष्ट्र कोषागार नियम 1968 चे मधील तरतुदीनुसार राजय शासनाच्या प्रत्येक निवृत्तीवेतन धारकाने हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षी कोषागार कार्यालयास बँकेमार्फत सादर करणे बंधनकारक आहे. तरी राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतन धारक यांनी आपल्या बँकेमार्फत हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणेसाठी ते ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेतात तेथे जाऊन हयात असलेची स्वाक्षरी करावी. हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवणेत आली आहे. घोषणापत्र (यादी) मध्ये नमूद असलेल्या निवृत्तीवेतन धारकाच्या नावासमोर समक्ष स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा करावा. दिनांक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 मध्ये हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही तर संबधीत निवृत्तीवेतन धारकाचे जानेवारी 2021 पासुन निवृत्तीवेतन पाठविले जाणार नाही याची नोंद निवृत्तीवेतन धारकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News