जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे उद्योजकांना आवाहन


जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे उद्योजकांना आवाहन

 शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व लघुउद्योजकांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करुन त्यांचा सन्मान करणेचे दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पातळीवर सन 1985 पासुन जिल्हा पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सन 2020 या वर्षासाठी ज्या उद्योग घटकांची स्थायी लघु उद्योग नोंदणी, सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम नोंदणी भाग-2, उद्योग आधार नोंदणी गत तीन वर्षाच्या अगोदर किंवा त्यापूर्वी झालेली आहे व किमान सदर उद्योग सतत दोन वर्षे उत्पादन करीत आहे असे लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरु शकतात. तरी सदर योजनेअंतर्गत अर्ज करु इच्छिणा-या सर्व लघुउद्योग घटकांनी  यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी केले आहे.


विहित नमुन्यातील अर्जासोबत स्थायी लघुउद्योग नोंदणी, सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम नोंदणी भाग-2 प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचे सनदी लेखापालाचे वार्षिक ताळेबंद, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसल्याचा दाखला आदी अनुषंगिक माहितीसह महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, स्टेशन रोड, अहमदनगर यांचे कडे दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पूर्वी संपर्क साधावा.

सदर पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड जिल्हा स्तरावरील जिल्हाहाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली जिल्हा सल्लागार समितीमार्फत केली जाते. पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड, विकासाचा वेग, तंत्रज्ञानाचा वापर, स्वावलंबन, घटकांचे स्थान उत्पादन विकास व गुणवत्ता नियंत्रण, आयात, निर्यात, उत्पादनातील बदल, व्यवस्थापन, कामगारांच्या सुविधा इत्यादी निकषावर केली जाते. तसेच सदर उद्योजक हा कोणत्याही बँकेचा, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. मागासवर्गीय, अनुसुचित जाती जमातीच्या उद्योजकांना निवडीसाठी प्राधान्य दिले जाते. ज्या उद्योग घटकांना यापुर्वी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे उद्योग घटक पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंर्गत प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ तर द्वितीय पुरस्कार रुपये दहा हजार रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News