डाऊच खु॥ गावात सखी महिला कृषी बचत गटाची दीपावली पूर्व बैठक संपन्न!!


डाऊच खु॥ गावात सखी महिला कृषी बचत गटाची दीपावली पूर्व बैठक संपन्न!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

  महीलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपक्रम राबविले जाताता. महीलांना स्वावलंबी  बनविण्यासाठी महीला बचतगटा सारखे उपक्रम राबवुन गृह उद्योगासारख्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य व व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.यापुढे जाउन महिला कृषी विभागाच्या सहकार्या ने कृषी बचत गटाच्या माध्यमातुन कृषी व्यवसायातही आपले वर्चस्व सिद्ध करत आहेत. या पाश्र्वभुमीवर कोपरगाव तालुक्यातील डाऊचखु॥ गावात सखी महीला बचत गटाची दिपावली पुर्व बैठक पार पडली. या बैठकीत या गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती व इतर शेतीविषयक सर्व आत्मसात केलेल्या माहितीचा वापर आपल्या शेतात करण्याचा इतर व शेतकरी वर्गाला देण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी

     मंडळ कृषी अधिकारी श्रीमती माधुरी गावडे यांच्या हस्ते  सारिका रोहमारे यांना सखी महिला कृषी बचत गटात सामील करून घेत त्यांचे स्वागत करण्यात आले. 

    तसेच सखी कृषी महिला गटाच्या माध्यमातुन दर महिन्याच्या एका तारखेला काहीतरी नवीन उपक्रम राबवुन गावातील इतर महीलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात या महीन्यात गावतील महिलांना रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण देउन त्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.त्यासाठी लागणारे ट्रे, कोकोपिट, वांगी बियाणे असे सर्व साहीत्य बचतगटातील चोविस सदस्य स्वखर्चाने देणार आहेत.

 याप्रसंगी सोनावणे मॅडम यांनी सर्व सभासदांना दिपावली निमीत्ताने मिठाई व भेट म्हणून दिवे वाटप केले. बचत गटाच्या सचिव मंगल गुरसळ यांनी प्रस्ताविक केले. तसेच उपस्थितांचे आभार सौ.हिराबाई शंकर गुरसळ यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News