कोपरगाव शहरातील विस्थापित झालेल्या टपरीधारकांसाठी मंजुर असलेले खोकाशाॕपचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा उपोषण !!


कोपरगाव शहरातील विस्थापित झालेल्या टपरीधारकांसाठी मंजुर असलेले खोकाशाॕपचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा उपोषण !!

उपनगराध्यक्षांसह भाजप शिवसेनेच्या गटनेत्यांचे मुख्याधिका-यांना निवेदन.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपालिका हददीतील विस्थापित झालेल्या टपरीधारकांसाठी मंजुर असलेल्या खोकाशाॕपचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येउन टपरीधारकांना खोकाशाॕप उपलब्ध करून दयावे,अशी मागणी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,भाजपा गटनेते रविंद्र पाठक,शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली, यावेळी त्यांचे समवेत माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, सत्येन मुंदडा, दिनेश कांबळे, रविंद्र रोहमारे,दिपक जपे,व्यापारी संघर्ष समितीचे अकबर शेख, अंकुश वाघ,शरद त्रिभुवन,उमेश धुमाळ,बालाजी गोर्डे, सचिन गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. 

मार्च 2011 मध्ये शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली होती. या टपरीधारकांचे पुर्नवसन करण्यात यावे, म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला. त्याप्रमाणे नगरपरिपदेच्या 15 एप्रिल 2017 रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. त्याचप्रमाणे यापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब, मा.बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु आज अतिक्रमण अनेक दिवस उलटूनही नगरपरिपद विस्थापितांना  खोकाशाॕप देउ शकली नाही. त्यामुळे विस्थापिंताचे मोठया प्रमाणात हाल झाले. अनेकांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, त्यात सध्याच्या कोरोना महामारीमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली. छोटे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटूंबावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. तरी पालिकेने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देउन विस्थापितांना खोकाशाॕप तातडीने उपलब्ध करून दयावी, अषी मागणी या शिष्टमंडळाने पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात येत्या आठ दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा पालिकेसमोर उपोपण करणार असल्याचे सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News