पोलीस वसाहत व इमारतीच्या पुढील कामासाठी निधी आणू – आमदार आशुतोष काळे


पोलीस वसाहत व इमारतीच्या पुढील कामासाठी निधी आणू – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सुरु असलेल्या इमारत कामाची व पोलीस वसाहतीची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समवेत पाहणी करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील पोलीस वसाहतीची दुरावस्था अत्यंत वाईट झाली आहे.दिवसरात्र सदैव सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांनी कोरोना संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता दिलेले योगदान कोपरगावची जनता कधीही विसरणार नाही. त्या पोलीस बांधवांच्या वसाहतीसाठी व पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या सूरु असलेल्या पुढील कामासाठी निधी आणू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिली.

              आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सुरु असलेल्या इमारत कामाची व पोलीस वसाहतीची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी आमदार काळे म्हणाले की, कोरोना संकटामुळे विकास निधीसाठी मर्यादा आहेत. मात्र राज्याची आर्थिक घडी हळूहळू रुळावर येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भविष्यकाळात पोलीस बांधवांच्या वसाहतीसाठी व पोलीस स्टेशनच्या इमारतीचे पुढील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करून निधी आणू.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे.कोपरगाव तालुक्यात केलेल्या उपाय योजना व नागरिक सर्वोतोपरी काळजी घेत असल्यामुळे आजमितीला कोपरगाव तालुक्यात कोरोनावर काही प्रमाणात वर्चस्व मिळविण्यात यश आलेलं आहे. मात्र पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. आज जरी या गुन्ह्यांची कार्यवाही होत नसली तरी भविष्यात या नागरिकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल न करता माफक दंड करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत मांडली. सदर मागणीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे न दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण विश्व कोरोना लसीची आतुरतेने वाट पाहत असले तरी आजमितीला कोरोनावर एकच लस उपलब्ध आहे ती म्हणजे मास्क. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क घालूनच घराबाहेर पडावे त्यामुळे पोलीस देखील कारवाई करणार नाही व कोरोनाचा संसर्ग देखील टाळता येईल त्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने मास्कचा वापर करावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

                           यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, राहुल देवळालीकर, सागर लकारे, वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शहरचे राकेश माणगावकर, उपनिरीक्षक सचिन इंगळे, आर्किटेक्ट शितल भुतडा आदी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News