पोलीस स्टेशनच्या वतीने अनोखा उपक्रम,सर्व सामान्य लाभार्थ्यांचा मुद्देमाल विना शुल्क परत- जीवन माने


पोलीस स्टेशनच्या वतीने अनोखा उपक्रम,सर्व सामान्य लाभार्थ्यांचा मुद्देमाल विना शुल्क परत- जीवन माने

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने अनोखा उपक्रम सर्व सामान्य लाभार्थ्यांचा मुद्देमाल विना शुल्क परत केल्याची माहिती पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

      पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या वर्षानुवर्ष ताब्यात असलेला मुद्देमाललाची  कागदपत्रे तपासणी करुन खात्री झालेनंतर पंधरा लाख नउ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विनाखर्चाचा मिळाल्याने भिगवण आणि परीसरातील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडुन वहात होता. पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

       भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने या अगोदर  आव्हान  करण्यात आले होते त्यानुसार सदर मुद्देमाला मध्ये सहा तोळ्याचे मंगळसूत्र तीन लाख बारा हजार रुपये किमतीचा ऐवज न्यायालयीन आदेशानुसार सपुर्त करण्यात आले.तसेच इतर गुन्हयातील  नउ हजार किमतीची रोख  रोकड फिर्यादीस अदा करण्यात आली. तसेच चार चाकी दोन वाहने आणि दोन चाकी चार वाहने, मोबाईल आणि इतर वस्तू नागरिकांना परत करण्यात आल्या आहेत. भिगवण पोलीस स्टेशनचा हा अनोखा उपक्रम पुणे जिल्हा अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि विशेष मोहीम राबविण्यात आल्याची माहिती भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  जीवन माने यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News