मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेला त्रास व महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे


मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेला त्रास  व महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे

मनसे सहकार सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नगर (-प्रतिनिधी संजय सावंत) 

महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनी कडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत तसेच पतसंस्था, बँकांकडील महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे, सरचिटणीस अनिल चितळे, उपाध्यक्ष डि.एन.साबळे, ज्ञानेश्‍वर गाडे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिज्ञे, उपाध्यक्ष मनोज राऊत, मारुती रोहोकले, पप्पू लामखेडे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, मनसेच्या विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलतांना दिलीप धोत्रे म्हणाले,  महाराष्ट्रातील लाखो माता- भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून व्यवसाय साठी कर्ज घेतली आहेत. गेली 10ते 15 वर्ष झाले हे कर्ज घेत असून ते नियमित पणे परत फेड करत आले आहेत. हे कर्ज घेत असताना मायक्रो फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दर वर्षी विमा पॉलिसी च्या नावाखाली हजारो रुपये घेतात, परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाहीत. सध्या कोरोनाच्या या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत, कोणाच्याही हाताला काम नाही,उपासमारीची वेळ आली आहे, नव्हे तर भूक बळी जात आहेत, अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. साहेब, महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत,, अनेक महिलांनी कर्ज घेऊन लोणचे, शेवया, पापड, यासारखे पदार्थ तयार केले होते, परंतु लॉक डाऊन  मुळे तो माल विकला गेला नाही आणि 6 महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे. तरी या संकटात सरकारने त्यांच्या मागे उभे राहून महिला बचत गटांंवर असणारे सर्व कर्ज माफ करावे, अशी आमची मागणी आहे.याप्रसंगी अ‍ॅड.अनिता दिघे म्हणाल्या, मायक्रो फायनान्सचे कर्मचारी रोजच त्या महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी  तगादा लावत आहेत, धमकी देत आहेत, घरातील साहित्य उचलून नेत आहेत, पैसे द्या नाही तर तुमचा टी व्ही ,फ्रिज, गॅस, भांडी घेऊन जातो अशी धमकी देत आहेत, महिलांना अश्‍लील बोलणे, शिविगाळ करणे, त्यांच्या घरात बसून राहणे, शरीर सुखाची मागणी करणे, असे मायक्रो फायनान्स चे गुंड करत आहेत.त्यांच्यावर तातडीने कारवाई करुन महिला बचत गटांना कर्जमाफी द्यावी.

     या मोर्चाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या मोर्चात बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्यावतीने महिला बचत गटांची कर्जमाफी झाल्याच पाहिजे, यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मनसे सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे, सरचिटणीस अनिल चितळे, उपाध्यक्ष डि.एन.साबळे, ज्ञानेश्‍वर गाडे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,  सचिव नितीन भुतारे,देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिज्ञे, उपाध्यक्ष मनोज राऊत, मारुती रोहोकले, पप्पू लामखेडे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर आदि. (छाया : राजु खरपुडे)


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News