कामगार कल्याण मंडळाने ऑनलाईन प्रक्रियेतील त्रूटी दुर कराव्यात..डॉ. भारती चव्हाण


कामगार कल्याण मंडळाने ऑनलाईन प्रक्रियेतील त्रूटी दुर कराव्यात..डॉ. भारती चव्हाण

कामगार कल्याण मंडळाच्या चूकीमुळे कामगार लाभापासून वंचित

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 2 नोव्हेंबर 2020) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून नव्यानेच ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतू असा बदल करीत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही आस्थापनांना किंवा कामगारांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडून कामगार व त्यांच्या कुटूंबियांना देण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. यातील तांत्रिक त्रुटी ताबडतोब दूर कराव्यात व याबाबतची माहिती राज्यातील सर्व आस्थापना, कामगार व कामगार संघटनांना द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी कामगार कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

      महाराष्ट्रातील सर्व छोट्या मोठ्या आस्थापना कामगारांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कापून कामगार कल्याण मंडळाकडे जमा करतात. या जमा झालेल्या निधीतून कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. यामध्ये कामगारांच्या पाल्यांना पुस्तक खरेदी व इतर अनेक शैक्षणिक सोयी सवलतींसह देशात व परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, महिलांसाठी उद्योजकता शिबीर, व्यवसाय मार्गदर्शन व सहाय्य, इनडोअर व आऊटडोअर क्रिडा सुविधा अशा उपलब्ध आहेत. त्यासाठी कामगारांना मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. परंतू या वर्षीपासून मंडळाचे काम नविन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले आहे. त्याअंतर्गत विविध आस्थापनांनी कामगारांच्या वेतनातून वजावट करुन जमा केलेला निधी मंडळाकडे जमा केला आहे. परंतू गरजू कामगार जेंव्हा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करतात तेंव्हा लिन नंबर (लेबर आयडेंटीफिकेशन नंबर) उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा कोट्यावधी कामगारांची मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी होत नाही. त्यामुळे विविध योजनांपासून हे कामगार व त्यांचे कुटूंबिय वंचित आहेत. लाखो आस्थापनांना या विषयी स्पष्ट निर्देश नसल्यामुळे अनेक कंपनी व्यवस्थापनांनी कामगारांची वैयक्तिक माहिती या प्रणाली मध्ये अपलोड केलेली नाही. त्यामुळे अशा कोट्यावधी कामगारांना कल्याण मंडळांच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. या ऑनलाईन प्रक्रिये संदर्भात महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांना त्वरित कामगार कल्याण मंडळाने परिपत्रक काढून स्पष्ट निर्देश द्यावेत आणि "लिन" नंबर क्रिएट करण्याबाबत आदेश द्यावेत. याबाबत झालेल्या दिरंगाईची दखल घेऊन कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची मुदत वाढविण्यात यावी त्यामुळे कामगारांना या योजनांचा लाभ घेता येईल अशीही मागणी डॉ. भारती चव्हाण यांनी या पत्रात केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News